Madhuri Dixit Troll : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. (Madhuri Dixit Mother Death) आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितच्या आयुष्यात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. माधुरीनं तिच्या आईला म्हणजेच स्नेहलता दीक्षित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी एक शोकसभा ठेवली होती. यावेळी त्या शोकसभेत माधुरीला पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माधुरीनं असं काय केलं की तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. माधुरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत माधुरीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरीचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत माधुरी तिच्या कुटुंबासोबत या शोकसभेत शामिल झाल्याचे दिसत आहे. सुरुवातीला माधुरी पुढे येते आणि फोटोग्राफर्ससाठी पोज देऊ लागते. त्यानंतर फोटोग्राफर्स बोलत असताना ती तिचा पती डॉक्टर नेने आणि मुलांना तिच्यासोबत उभं राहून फोटोसाठी पोज देण्यास सांगते. डॉक्टर नेने माधुरीच्या बाजुला थांबतात आणि पापाराझींसमोर हात जोडतात आणि लगेच पुढे निघतात. तर दुसरीकडे तिची दोन्ही मुलं पापाराझींना पोज देत नाहीत आणि सरळ पुढे निघून जातात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


माधुरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर


माधुरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ती इतकी निराश दिसतही नाही जसं बॅकग्राऊंडला म्युजिक प्ले करण्यात आलं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मेकअप करणं महत्त्वाचं आहे. तुला हे शोभत का?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'शोकसभेत फोटो काढणं गरजेच आहे?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मुलांना अजून फोटो काढण्यासाठी बोलावते पण त्या मुलांना आजीसाठी वाईट वाटतयं. ते फोटो काढायला आलेच नाही.' 


हेही वाचा : Photo : 'कॉमेडी सर्कस' मधील छोटी गंगुबाई आठवतेय का? आता दिसतीये एकदम बोल्ड


तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. एक नेटकरी म्हणाला, 'तुम्ही तिला का ट्रोल करत आहात. ती निराश नाही याचा अर्थ असा नाही की तिला वाईट वाटतं नाही. कदाचित ती यासाठी आधीपासून तयार असेल कारण तिची आई ही 91 वर्षांची होती.' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'लोकांना सगळीकडे गरज नसताना काही बोलायचे असते.'