...तर थिएटर्समध्ये जाळपोळ करू - महाराणा प्रताप बटालियन
संजय लीला भन्साळींचा महत्त्कांक्षी सिनेमा पद्मावतीचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा या सिनेमावरुन वाद सुरु झालाय.
मुंबई : संजय लीला भन्साळींचा महत्त्कांक्षी सिनेमा पद्मावतीचा पहिलाच ट्रेलर प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा या सिनेमावरुन वाद सुरु झालाय.
महाराणा प्रताप बटालियन संघटनेने या सिनेमाला कडाडून विरोध केलाय. भन्साळी राणी पद्मावतीची कथा चुकीच्या पद्धतीने पडद्यावर आणत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
जर भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केली असेल तर हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही. प्रसंगी थिएटर्समध्ये जाळपोळ करु, असा इशारा या संघटनेचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिला आहे.
याआधीही, करणी सेनेनं या चित्रपटाला आपला विरोध दर्शवला होता. पद्मावती सिनेमा आम्हांला दाखवल्याशिवाज सिनेमागृहात लावला जाऊ नये अन्यथा होणार्या नुकसानाला आम्ही जबाबदार राहणार नाही... असा इशाराही करणी सेनेनं दिलाय.
राजस्थानात पद्मावती सिनेमाच्या शुटिंगला विरोध झाल्यानंतर कोल्हापुरातील मसाई पठारावर सिनेमाचं शुटिंग सुरू सुरू असताना मार्च २०१७ मध्ये जवळपास ५० अज्ञातांनी येऊन सेटची जाळपोळ केली होती. सेटवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याने सेटला आग लागली. यावेळी या जमावाने सेटच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.