मुंबई : 20 सप्टेंबर 1948 मध्ये फिल्ममेकर महेश भट्ट आज 69 वर्षांचे झाले. वयाच्या या टप्प्यावर महेश भट्ट यांनी आपली एक मनातील खंत बोलून दाखवली आहे. एका मुलाखतीत त्याला विचारण्यात तुम्ही कसे वडिल आहात त्यावर महेश भट्ट यांनी उत्तर दिलं की, मी माझ्या वडिलांना पाहिलं नाही त्यामुळे मला वडिलांचा काही अनुभव नाही की वडिलांचा काय रोल असतो. मी एका मुस्लिम आईचा लग्ना अगोदरचा मुलगा आहे. ज्यांनी मला एकट्याचा सांभाळ केला आहे तिचं नाव शिरिन मोहम्मद अली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश भट्ट यांनी जेव्हा आईला आपल्या नावाचा अर्थ विचारला तेव्हा आईने उत्तर दिलं की, मी तुझ्या वडिलांना विचारून सांगते. कारण त्यांनीच तुझं नाव ठेवलं आहे. महेशचा अर्थ आहे महा-ईश म्हणजे देवांचा देव. मात्र लहानपणी मला देव पसंत नव्हते. शंकराने आपल्या मुलाचंच डोकं उडवलं होतं हे महेश भट्ट यांना काही पटलं नाही. 


तेव्हा मी बोललो होतो की, माझं नाव गणेश ठेवायला हवं होतं. जसे गणेशचे वडिल त्याच्यासाठी अनोळखी होते अगदी तसेच माझे वडिल देखील अनोळखी होते. महेश भट्ट यांनी आपल्या आत्मकथेत देखील म्हटलं आहे की, माझ्या वडिलांच नाव नानाभाई भट्ट जे माझ्यासाठी असून पण नसल्यासारखे आहेत. मात्र त्यांच भट्ट हे नाव मला नक्की मिळालं. ज्यामुळे आज मी महेश भट्ट बनलो आहे.