`आयटम म्हणाल तर...`, संतापात कोणाला बजावतेय Malaika Aarora?
`आयटम` म्हणताच संतापली मलायका अरोरा, दिली अशी तंबी
मुंबई : फिटनेस, डान्स, मॉडेल... या तिन्ही गोष्टींचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा. इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये आज मलायकाची नोंद आहे. स्वतःच्या बळावर मलायकाने आज चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. मलायका अरोरा आज फक्त टीव्ही विश्वात सक्रिय असली, तरी तिची ओळख तिच्या डान्सवर आहे. मलायकाच्या डान्समुळे तिला ओळख मिळाली. अनेक सिनेमांमध्ये आपल्याला 'आयटम सॉन्स' पाहायला आणि ऐकायला मिळतात.
मलायका देखील अनेक सिनेमांमध्ये 'आयटम सॉन्स'वर थिरकली आहे. पण मलायकाला तिच्या गाण्यांना 'आयटम सॉन्स' म्हणालेलं बिलकूल आवडत नाही. काही वर्षांपूर्वी अनुपमा चोप्राला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली होती की, जो कोणी 'आयटम सॉन्स' म्हणेल, त्याच्या मी कानशीलात लगावेल.
यावेळी मलायकाने 'सेक्सी' शब्दावर देखील आपलं मत मांडलं. मलायका म्हणाली, 'सेक्सी बोलायला मला आवडेल. कोणाला फिकी डाळ आवडते का? प्रत्येकाला तडका लावलेली डाळ आवडते..' अस देखील मलायका म्हणाली.
मलायकाने 'छय्या छय्या' सिनेमातून चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली. जर तेव्हा मलायका 'छय्या छय्या' गाण्यावर ठेका धरण्याची संधी मिळाली नसती, तर आज मलायता शिक्षक किंवा शेफ असती.
पण आता मलायकाने कलाविश्वात वेगळा ठसा उमटवला आहे. मलायका तिच्या प्रोफेशन आणि खसागी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेता अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.