मुंबई : भारतीय कलाविश्वात काही सेलिब्रिटींची नावं ही अतिशय आदरानं आणि तितक्याच आपलेपणानं घेतली जातात. अशाच सेलिब्रिटींपैकी एका लोकप्रिय व्यक्तीला त्यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. कलाविश्वात आपल्या योगदानानं आणि प्रभावी अंदाजानं प्रेक्षकांच्या मनावर गेली कित्येक दशकं अधिराज्य गाजवणारा हा चेहरा म्हणजे मोहनलाल यांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये ज्याप्रमाणे अभिनेता रजनीकांत, ममूथी, कमल हसन, चिरंजीवी यांच्या नावाला वजन प्राप्त आहे, त्याचप्रमाणे मोहनलाल हेसुद्धा या कलाकारामधील एक नाव. दाक्षिणात्य विशेष म्हणजे मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं योगदान अतीव महत्त्वाचं. गतकाळातील कलेला नव्या पिढीशी जोडणारा एक भक्कम दुवा म्हणजे मोहनलाल. 


लोकप्रितेच्या शिखरावर असणाऱ्या याच अभिनेत्यावर सध्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नव्या जोमाच्या कलाकारांपासून ते अगदी दिग्गज कलाकार मित्रांपर्यंत आणि राजकीय नेतेमंडळींपर्यंत सर्वांनीच मोहनलाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


खुद्द मोहनलाल यांनीही जीवनातील हा अतीशय महत्त्वाचा दिवस तितक्याच खास पद्धतीने साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वत्र कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी कसोशीनं प्रयत्न सुरु असताना या प्रयत्नांमध्ये मोहनलाल यांनीही आपलं योगदान दिलं आहे. 


विश्वशांती फाऊंडेशन या आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कोरोना योद्धांना मदत म्हणून सुरु असणारं कार्य आता तिसऱ्या टप्प्यात आल्याची माहिती त्यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिली. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या लोकमान्य टिळक रुग्णालय, धारावी झोपडपट्टी भाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे हे पीपीई कीट्स देण्यात आले. 



 


रुग्णालयाशी संबंधित जबाबदार व्यक्तींकडे हे किट सोपवण्यात आले आहेत. रुग्णालयांसोबतच दारोदारी आऊन कोरोना चाचण्या करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीही हे पीपीई किट्स दिल्याची माहिती त्यांनी दिली. 


मोहनलाल यांनी उलचलेलं हे पाऊल आणि समामजाप्रती असणारी आपली जबाबदारी जाणत घेतलेला हा निर्णय पाहता अनेकांनीच कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. शिवाय ते दीर्घायू होवो, अशी कामनाही केली आहे.