मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत बऱ्याच काळानंतर नकाब या वेबसीरिजद्वारे अभिनय विश्वात पुनरागमन करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत मल्लिका कास्टिंग काउचवर बोलली. जेव्हा तिला विचारण्यात आलं की, तिला चित्रपटसृष्टीत कधी कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे का, यावर ती म्हणाली, मी फारसा सामना केला नाही पण अर्थात मलाही असे काही अनुभव आले आहेत. पण मला वाटतं लोक माझ्या जवळ येण्याआधी घाबरून जायचे. मला अशी ऑफर देण्यापूर्वी पुरुष घाबरून जायचे. मी जरा बोल्ड असल्यामुळे माझ्यासोबत गोष्टी उलट्या झाल्या. ही मुलगी गप्प राहणारी नाही किंवा घाबरणारीची. त्यामुळे माझ्याच प्रतिमेने मला यात मदत केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा मल्लिकाला विचारण्यात आलं की, वाईट बाईब्स देणाऱ्या लोकांपासून जाणूनबुजून दूर राहिली का? यावर ती म्हणाली, नेहमी, कारण हे सगळं तेव्हा घडतं जेव्हा तुम्ही स्वतःला त्या स्थितीत बसवता.  मी कधीच कोणत्याही निर्मत्याला किंवा दिग्दर्शककाला नाईटला हॉटेलच्या खोलित भटले नाही किंवा रात्री कोणाच्यही ऑफिसला गेले नाही. मी कायम या सगळ्यापासून लांब राहिले आणि आणि हा विचार केला की, जे माझ्या नशिबात आहे ते मला निश्चित मिळेल. मल्लिकाने तिच्या सुरुवातीच्या काळात अनेक सिनेमांत बोल्ड सीन देवून अनेकांची झोप उडवली होती.


ती पुढे म्हणाली, माझ्यावर अनेक आरोप झाले आणि मला जज केलं गेलं. अशा परिस्थितीत पुरुष स्वातंत्र्य होवू लागतात. माझ्या बाबतीतही असंच घडलं. मी अनेक प्रोजेक्ट गमावले कारण हिरो मला सांगायचे की, तू माझ्याशी इंटीमेट का होत नाहीस? जेव्हा तु हे सगळं पडद्यावर करू शकते, मग हे सगळं खाजगी आयुष्यात करायला काय हरकत आहे? यामुळेच मी अनेक प्रोजेक्ट सोडले गमावले. ''