Nivin Pauly Booked For Rape: मल्याळम कलाजगतामध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहता लैंगिक अत्याचार, शोषणाच्यचा घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांची नावं पुढे आली असून, मॉलिवूड सध्या एका भलत्याच कारणामुळं चर्चेत येताना दिसत आहे. फक्त मॉलिवूडच नव्हे, तर दाक्षिणात्य कलाजगताचा खरा चेहरा या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर आला आहे. अभिनेत्री साई पल्लवी हिच्यासोबत 'प्रेमम' या मल्याळम चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यावर एका महिलेनं गंभीर आरोप केले असल्याचं आता उघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या या आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्याचं नाव आहे निवीन पॉली. आपल्यावर झालेल्या या आरोपांनंतर अभिनेत्यानं पुढे येत झाल्या प्रकाराविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट लिहित हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं. शिवाय झाल्या प्रकरणी आपण आता कायदेशीर लढाई लढू असा निर्धारही व्यक्त केला. 


वर्षभरापूर्वी दुबईमध्ये... 


निवीन पॉलीवर 40 वर्षीय महिलेनं अत्याचाराचे आरोप केले असून, या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी दुबईमध्ये हा सर्व प्रकार घडला होता. ज्यानंतर आता या महिलेनं पोलिसात तक्रार दाखल करत चित्रपटामध्ये भूमिका देण्याच्या बहाण्यानं आपलं लैंगिक शोषण झाल्याची बाब तक्रारीमध्ये नमूद केली होती. सदर महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणात निवून पॉलीला सहावा आरोपी ठरवण्यात आलं आहे. श्रीया, बशीर, बीनू, कुट्टन आणि निर्माता एके सुनील हे या प्रकरणातील इतर आरोपी आहेत. महिलेनं केलेल्या आरोपांनुसार या 6 आरोपींनी तिचं विविध ठिकाणी लैंगिक शोषण केलं होतं. 


हेसुद्धा वाचा : S*x वर्करच्या भूमिकेनं रातोरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सध्या गंभीर आजारपणाशी देतेय झुंज; पैशांचीही चणचण, कोण आहे ती? 



निवीन पॉलीवर करण्यात आलेल्या या आरोपांनंतर ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि पाहता पाहता अखेर अभिनेत्यानंच पुढे येत आपली बाजू मांडली. 'एक खोटी बातमी माझ्या कानांवर आली आहे. जिथं एका तरुणीनं माझ्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. हे पूर्णपणे खोटं आहे. आता या आरोपांना निराधार सिद्ध करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार आहे. जबाबदार नागरिकांप्रमाणं मी महत्त्वाची कारवाई करेन. या प्रकरणाव कायद्यानं तोडगा काढेन', असं त्यानं पोस्टमध्ये लिहिलं. निवीनचं नाव पुढे आल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं हे निश्चित. आता यात पुढे आणखी किती नावं जोडली जाणार आणि नेमके कोणते गौप्यस्फोट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.