...पण या साऱ्याला अर्थ काय? त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मनवा नाईकचा थेट सवाल; घटनाक्रम वाचून हादराल
Manva Naik Emotional Post : मनवा नाईकनं सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत हा सगळा घटनाक्रम सांगितला आहे.
Manva Naik Emotional Post : मराठमोळी अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती मनवा नाईक ही नेहमीच चर्चेत असते. मनवा नाईक ही फक्त तिच्या अभिनयासाठी नाही तर इतर क्षेत्रातील तिच्या कामासाठी ओळखली जाते. याशिवाय मनवा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, आता मनवानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एका असिस्टंट दिग्दर्शकाच्या निधनाविषयी माहिती दिली आहे.
मनवानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका मुलाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मनवानं कॅप्शनमध्ये म्हटलं की 'गौरव काशिदे. एक खूप मेहनती आणि तरुण मुलगा जो आमच्यासोबत तुमची मुलगी काय करते पासून ते कारण गुन्ह्याला माफी नाही पर्यंत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. 26 वर्षाच्या या मुलानं एक नवीन बाईक घेतली आणि त्यानंतर आयफोन घेतला त्यामुळे तो उत्साही होता. त्यांच्या कुटुंबातील तो सगळ्यांचा लाडका होता, जो संपूर्ण कुटुंबाला त्याच्यावर गर्व होईल असं काम करणार होता.'
पुढे मनवा म्हणाली, '10 जून रोजी त्याचा वाढदिवस होता. त्यादिवशी संध्याकाळी सगळं काम संपवून जेव्हा आपण मुंबईकर पाऊस आल्याचा आनंद घेत होतो. तेव्हाच गौरवची एक प्रायव्हेट बसशी धडक झाली. हा सगळा प्रसंग वाकोला ब्रिज जवळ असलेल्या रस्त्यावर झाला. त्याची सर्जरी झाली, तो 10 दिवस आयसीयूमध्ये होता मात्र, अखेर त्याचा लढा तिथेच संपला. आम्ही गौऱ्याला गमावलं.'
पोलिसांनी तक्रार करुन घेतल्याचे सांगत मनवा पुढे म्हणाली,'पोलिसांनी त्या खासगी बस ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर इन्शुरन्स देणारी व्यक्ती समोर आली. पोलिसांनी या सगळ्या घटनेसाठी बस ड्रायव्हर दोषी असल्याचे सांगितले कारण ती बस रस्त्याच्या कडेला न थांबता मध्येच थांबली होती. पण आता त्यात काय अर्थ आहे? आम्ही गौरवला गमावलं... हे सगळं टाईप करत असताना मला अजूनही तो या या असा आवाज ऐकायला येतोय. मुला तुझ्या आत्म्याला शांती मिळो.'
हेही वाचा : 60 व्या वर्षी ब्रॅड पिट करणार तिसरं लग्न? दुसरी पत्नी एंजेलिना जोली अन् 6 मुलांमुळे घेतला निर्णय!
दरम्यान, मनवा नाईकनं केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत गौरवच्या आत्म्याला शांती मिळो असं म्हटलं आहे. हा क्षण आपल्या सगळ्यांसाठी दु:खद आहे, असं देखील अनेकांनी म्हटलं आहे.