60 व्या वर्षी ब्रॅड पिट करणार तिसरं लग्न? दुसरी पत्नी एंजेलिना जोली अन् 6 मुलांमुळे घेतला निर्णय!

Does Brad Pitt is Getting Married for the Third Time : ब्रॅड पिट तिसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 23, 2024, 01:46 PM IST
60 व्या वर्षी ब्रॅड पिट करणार तिसरं लग्न? दुसरी पत्नी एंजेलिना जोली अन् 6 मुलांमुळे घेतला निर्णय! title=
(Photo Credit : Social Media)

Does Brad Pitt is Getting Married for the Third Time : हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट हा पुन्हा तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकू शकतो. रिपोर्ट्सचा दावा आहे की ब्रॅड पिट हा गर्लफ्रेंड इनेस डी रामोनसोबत खूप आनंदी आहे. तिच्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक आहे. अफवाह ही देखील आहे की ते एकत्र कुटुंब सुरु करण्याचा विचार करत आहेत. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एंजेलिना जोलीप्रमाणे त्याच्या तीन मुलांनी एक-एक करुन त्याचं आडनाव हे काढून टाकण्यास सुरुवात केली. 

ब्रॅड पिट आणि इनेस डी रामोन हे कथितपणे गेल्या वर्षभरा पेक्षा जास्त काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. असं म्हटलं जातं की ते दोघं लिव्ह इनमध्ये राहू लागले आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जवळच्या एका व्यक्तीनं दिलेल्या माहिती नुसार, की 60 वर्षांचा हा अभिनेता तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहेत. ते देखील लवकरच.  दरम्यान, असं देखील म्हटलं जातं की लग्नानंतर ते लवकरच कुटुंबाची प्लॅनिंग विषयी विचार करणार आहेत. ते दोघं एकत्र आनंदी आहेत. 

ब्रॅड पिटचं पहिलं लग्न

ब्रॅड पिटच्या पहिल्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर त्यानं 2000 मध्ये जेनिफर एनिस्टनशी लग्न केलं होतं. जेनिफर एनिस्टन ही 'फ्रेंड्स' या अमेरिकन मालिकेसाठी ओळखली जाते. या मालिकेत तिनं रेचल ही भूमिका साकारली होती. 2004 मध्ये 'मिस्टर एंड मिसेज स्मिथ' च्या शूटिंग दरम्यान, ब्रॅडला एंजेलिना जोलीवर प्रेम झालं. ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले आणि 2005 मध्ये त्यानं जेनिफर एनिस्टनला घटस्फोट दिला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ब्रॅड पिटचं दुसरं लग्न

बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2014 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं आणि दोन वर्षातच त्यांच्यात भांडण वाढू लागली. ब्रॅड पिटनं मुलांसमोर तिच्यावर फिजिकल हल्ला केल्याचा आरोप एंजेलिनानं केला. 2019 मध्ये त्यांच्यातील कायदेशीर लढाई संपली. ब्रॅड पीट आणि एंजेलिनाला 6 मुलं आहेत. ज्यात मेडॉक्स 22, जहरा 19, पॅक्स 20, शिलोह 18, आणि जुळी मुलं नॉक्स आणि विविएन 15 वर्षांचे आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...

त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष ब्रॅड पीटवर लागले आहे. कारण खरंच तो गर्लफ्रेंड Ines De Ramon शी लग्न करणार आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.