Prarthana Behere House Beach View: अभिनेत्री प्रार्थना बेहेर कायमच आपल्या बोल्ड तसेच सोज्वळ लुकसाठी ओळखली जाते. तिचे अनेक चित्रपट आणि मालिका या लोकप्रिय आहेत. सध्या तिच्या गाजलेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेची प्रचंड चर्चा होती. आता या मालिकेनं जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला (Prarthana Behere Serial) असला तरी अजूनही ही मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात. प्रार्थना ही इन्टाग्रामवर चांगलीच लोकप्रिय आहे तिचे इन्टाग्रामवर चांगले फॉलोवर्सही आहे. ती आपल्या चाहत्यांनी इन्टाग्रामवरून कायमच अपडेट ठेवत असते. आपले लेटेस्ट फोटोजही ती इन्टाग्रामवर शेअर करताना दिसते. प्रार्थनानं वर्षभरापुर्वी एक नवं घर घेतलं होतं ज्याची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. प्रार्थना अधूनमधून तिच्या घरातले फोटोज हे इन्टाग्रामवर पोस्ट (Prarthana Behere Instagram Post) करताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपुर्वी तिनं असाच एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावेळी तिनं आपल्या घरातून दिसणाऱ्या व्ह्यूची झलक प्रेक्षकांसाठी इन्टाग्रामवर शेअर केली आहे. यावेळी तिच्या या पोस्टला चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्सही आल्या आहेत. अनेकांनी प्रार्थनाच्या या सुंदर व्ह्यूचे प्रचंड कौतुक केले आहे. अनेकांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं लिहिलं आहे की, ''प्रार्थना तू खूप लकी आहेस की तु रोज सकाळी उठून इतका चांगला सुर्यास्त पाहू शकतेस'' तर दुसऱ्या एकानं लिहिलं की, ''तूझा घरातून दिसणारा हा व्ह्यू अत्यंत सुरेख आहे''. तर तिसऱ्यानं लिहिलंय की, ''खूप हेवा वाटतो; असं दृश्य पाहायलाही भाग्य लागतं.''


हेही वाचा - 'दसरा' फेम अभिनेत्रीनं आपल्या मिस्ट्री मॅनबद्दल केला खुलासा, ट्विट करत काय म्हणाली पाहा!


काहींना हे तिचं घर आहे की नाही यावरही प्रश्न पडले आहे कारण प्रार्थनानं (Prarthana Behere Beach Video) आपल्या पोस्टमध्ये बाकी काहीच लिहिलेलं नाही. तिनं हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'लाईक इज ब्यूटीफूल'. या व्हिडीओमध्ये मस्त सुर्यास्त दिसतो आहे आणि समुद्रकिनाऱ्यावरील शांतताही पाहायला मिळते आहे. यावेळी काहींना 'हा व्ह्यू जुहू बीचचा आहे का?' असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तर एकानं कमेंट केलंय की, ''हे कुठल्या बीचच्या जवळच घर आहे?'' दुसऱ्या एका युझरनं वेगळीच कमेंट केली आहे. त्यानं लिहिलंय की, ''ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना हे सुख मिळतं.'' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


2015 साली आलेल्या 'मितवा' (Mitwa) या चित्रपटानं प्रार्थना बेहेरेला एक वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे. स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासमवेत तिनं या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर आलेल्या 'कॉफी आणि बरंच काही' या चित्रपटामुळेही प्रार्थनाच्या लोकप्रियेत वाढ झाली आहे. अभिनयात येण्यापुर्वी प्रार्थना रिपोर्टर होती.