Kartiki Gaikwad Pregnancy : छोट्या पडद्यावरील गाण्याचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ला ओळखले जाते. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणून कार्तिकी गायकवाडला ओळखले जाते. तिने तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता कार्तिकी गायकवाडने तिच्या चाहत्यांना एक मोठी गुडन्यूज दिली आहे. कार्तिकी गायकवाड लवकरच आई होणार आहे. तिच्या डोहाळे जेवणाचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांनी 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या चार वर्षांनी आता कार्तिकी आणि रोनितच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. या एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओत कार्तिकीच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. यात कुणीतरी येणार येणार गं असे लिहिलेली एक भव्य रांगोळीही पाहायला मिळत आहे. कार्तिकीने तिच्या नवऱ्यासह ग्रँड एंट्री घेतली आहे. यावेळी तिचे कुटुंबीय देखील दिसत आहे.


कार्तिकी गायकवाडच्या डोहाळे जेवणाचे खास फोटो


यावेळी कार्तिकीने हिरव्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. यासोबतच तिने सुंदर दागिनेही परिधान केले होते. यात तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो पाहायला मिळत आहे. कार्तिकीने डोहाळे जेवणाचे अनेक फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोत कार्तिकी गायकवाड छान हसताना दिसत आहे. कार्तिकीने या फोटोंना "ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण" असे कॅप्शन दिले आहे. 



कार्तिकी गायकवाडने ही गुडन्यूज दिल्यानंतर आता तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने या फोटोवर "अभिनंदन" अशी कमेंट केली आहे. तर मेघना एरंडेने हार्ट इमोजी पोस्ट करत यावर कमेंट केली आहे. तसेच अनुष्का सरकटेने "कार्तिकी मी तुझ्यासाठी खूपच आनंदी आहे. अभिनंदन, खूप प्रेम", अशी कमेंट केली आहे. तसेच प्रियांका बर्वेने खूप खूप अभिनंदन, तुझा चेहरा खूप फुलला आहे, असे म्हटले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by fillamwala (@fillamwala)


दरम्यान कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांनी 2020 मध्ये लग्नगाठ बांधली. रोनित पिसे हा व्यावसायिक आहे. तो पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. सध्या गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.