मुंबई : कायम वादाचा मुकूट डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राजकीय, सामाजिक अथवा कोणताही मुद्दा असूदे कंगना कायम त्यावर स्वतःचं मत मांडायाचीय. प्रत्येक गोष्टीवर मत मांडण्याची सवय कंगनाला भारी पडली आहे. ट्विटरच्या माध्यमातून ती सतत ट्विट करायची. पण आता खुद्द ट्विटरने तिची टीव-टीव बंद केली आहे. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर ट्विटरवर #KanganaRanaut हा हॅशटॅग ट्रेंड झाला. आता कंगनाने या सगळ्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने म्हटलं की,'ट्विटरने कायमच सिद्ध केलं आहे की, त्याचा जन्म अमेरिकेत झाला. ते सफेद व्यक्ती आहेत. भारतात राहणाऱ्यांना गुलामच बनवण्याचा प्रयत्नात असतात. ते तुम्हाला सांगणार की, तुम्ही काय विचार करता, काय बोलता आणि काय करायचं आहे. माझ्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यामधून मी माझा आवाज अधिक स्पष्टपणे मांडू शकते.'


एवढंच नाही तर कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलेल्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे.