मुंबई : 'मेंटल है क्या' या चित्रपटातून कंगणा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कंगणाने आतापर्यंत केलेल्या अनेक भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या कंगणाच्या प्रत्येक भूमिकेकडे तिच्या चाहत्यांचं आणि तिच्या विरोधकांचंही तितकंच लक्ष असतं. मेंटल है क्या या चित्रपटात कंगणाच्या जोडीला अभिनेता राजकुमार राव झळकणार आहे. २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.



'मेंटल है क्या' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. पोस्टरमध्ये त्यांच्या जिभेवर ब्लेड असल्याचे दिसत आहे. काहींनी हे हानिकारक असल्याचे सांगितले आहे. प्रकाश कोवलमूडी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.