मुंबई : स्वप्नांच्या या मायानगरीत आतापर्यंत अनेकांच्या स्वप्नांना पंख मिळाले आणि या पंखांच्या जोरावर कलाकांरांनी गगन भरारी घेतली. असाच एक कलाकार म्हणजे अभिनेता अली फजल. 'मिर्झापूर' या  वेबसीरिजमध्ये ‘गुड्डू पंडित’ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या अलीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आपल्या अभिनयाने अलीने प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिलं. अलीने अर्थशास्त्रमध्ये पदवी संपादन केली आहे.पण एक मॉडेल म्हणून त्याने कारकिर्दीला सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करियरच्या सुरूवातीला त्याने एक मॉडेल म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अभिनेता आमिर खान स्टारर '3 इडियट्स' चित्रपटात अभिनय करण्याची  त्याला संधी मिळाली. त्यानंतर अलीने कधी मागे वळून पाहिलं नाही. स्वतःला कलाविश्वात सिद्ध करणारा अली  आज रॉयल लाईफ स्टाईल जगत आहे. त्याच्याकडे आज भरपूर संपत्ती आहे. 



journalyug.com की रिपोर्टनुसार अलीकडे जवळपास 25 कोटी रूपयांची संपत्ती आहे. प्रसिद्धीझोतात आल्यामुळे त्याचे मानधन देखील वाढलं आहे. आज अली एका चित्रपटासाठी तब्बल 50 ते 60 लखा रूपये मानधन घेतो. 'मिर्झापूर'नंतर अलीच्या करियरला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. मायानगरीत अभिनेता व्हायचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मुंबईत स्वतःचं घर असल्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 


मुंबई स्वतःचं भव्य घर असणाऱ्या अलीला महागड्या आणि रॉयल गाड्याचा देखील शोक आहे. अलीकडे BMW 3 Series GT, Mercedes Benz GLE 250 D, Audi A4 यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.