मोबाईलच्या दुकानात जडलं प्रेम अन् झाली आयुष्याची सारथी, कोण आहे हॅरिस रौफची बायको?

Haris Rauf Love Story : पाकिस्तानी क्रिकेटर हॅरिस रौफ याचा व्हिडीओ व्हायरल (Haris Rauf Viral Video) झालाय. पाकिस्तानी चाहत्याला हॅरिसने धक्काबुक्की केली.

| Jun 18, 2024, 19:39 PM IST

Haris Rauf Wife Muzna Masood : व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे हॅरिसची पत्नी मुझना मसूद देखील दिसतीये. त्यामुळे आता दोघंही नवरा बायको सध्या चर्चेत आहे.

1/7

हॅरिस रौफ

पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर हॅरिस रौफ पत्नीसोबत फिरत होता. त्यावेळी हा राडा झाला. त्यावेळी मुझनाने हॅरिसला रोखण्याचा प्रयत्न केला, असं दिसतंय.

2/7

मुलीच्या प्रेमात क्लिन बोल्ड

हॅरिस रौफ हा तापट वृत्तीचा असल्याचं त्याचे सहकारी सांगतात. पण हाच हॅरिस एका मोबाईलच्या दुकानात एका मुलीच्या प्रेमात क्लिन बोल्ड झाला होता.

3/7

मुझना मसूद मलिक

हारिस रौफच्या पत्नीचे नाव मुझना मसूद मलिक आहे. दोघांचं डिसेंबर 2022 मध्ये लग्न झालं होतं. मात्र, त्याआधी दोघंही अनेक वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिले होते.

4/7

वर्गमित्र

हॅरिस रौफ आणि मुझना मसूद मलिक दोघंही वर्गमित्र राहिले होते. घरात गरिबी असल्याने हॅरिसने मोबाईल शॉपीमध्येही काम केलं होतं.

5/7

हॅरिस प्रेमात पडला अन्...

त्यावेळी मोबाईल शॉपी सर्वात आधी भेट दोघांची झाली होती. तिथंच हॅरिस मुझना मसूद मलिकच्या प्रेमात पडला. त्यानंतर दोघांनी प्रेम व्यक्त केलं होतं.

6/7

मॉडेल - फॅशन इन्फ्लुएंसर

मुझना व्यवसायाने मॉडेल, फॅशन इन्फ्लुएंसर आणि डिझायनर असून तिच्या सौंदर्याची केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही चर्चा होत असते.

7/7

मास कम्युनिकेशन

दरम्यान, पाकिस्तानी मीडियानुसार मुझनाने नुकतंच मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतलं आहे. पाकिस्तानमध्ये मुझनाचे अनेक चाहते देखील आहेत.