भारतील असं एक गाव, जिथे प्रत्येक घरात जुळी मुलं... शास्त्रज्ञही गुढ उकलण्यात अपयशी

Village Of Twins : जुळी मुलं होणं तशी साधारण बाब नाहीए. पण ही गोष्ट भारतातल्या एका गावाला लागू होत नाही. कारण या गावात जवळपास प्रत्येक घरात जुळी मुलं आहेत. या गावाल व्हिलेज ऑफ ट्विन्सही म्हटलं  जातं. यामुळेच या गावाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. 

| Jun 18, 2024, 17:49 PM IST
1/7

एका रिपोर्टनुसार, जुळी मुले असणे फार दुर्मिळ आहे. भारतात 1000 मुलांमागे 9 जुळी मुलं असं प्रमाण आहे. पण भारतात असं एक गाव आहे, जिथे जवळपास प्रत्येक घरात जुळी मुलं आहे.

2/7

केरळात कोडिन्हो नावाचं गाव आहे. हे गाव जुळ्या मुलांसाठी प्रसिद्ध आहे. 2008 च्या आकडेवारीनुसार दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात जुळ्या मुलांची संख्या तब्बल 400 इतकी आहे. 

3/7

कोडिन्हो गावात असं काय आहे जिथे जुळ्या मुलांची संख्या इतकी आहे? खरं तर शास्त्रज्ञही याचं गुढ उकलण्यात आतापर्यंत अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे गाव एक रहस्य बनलं आहे.

4/7

जुळी मुलं जास्त असल्याने कोडिन्हो गावाला ट्विन टाऊन असंही म्हटलं जातं. इथं ट्विन्स अँड किन असोसिएशनची स्थापनाही करण्यात आली आहे. या असोसिएशनमार्फत जुळ्या मुलांना आर्थिक मदत केली जाते.

5/7

जुळ्या मुलं पाहण्यासाठी या गावाला अनेक जण भेटही देतात. या गावाच्या प्रवेशद्वारावरच एक निळ्या रंगाचा मोठा बोर्ड लावण्यात आला आहे. यावर मोठ्या अक्षरात जुळ्या मुलांच्या गावात तुमचं स्वागत आहे, असं लिहिण्यात आलं आहे. 

6/7

दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात जवळपास सर्व वयोगटातील जुळी मुलं आहेत. त्यामुळेच कोडिन्हो गावाचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंदवण्यात आलंय.

7/7

केरळातलं हे कोडिन्हो गाव जुळ्या मुलांमुळे नेहमीच चर्चेत असतं. या गावात गेल्या तीन पिढ्यांपासून जुळ्या मुलांचा परंपरा आहे. या गावात जुळ्या मुलांची पहिली जोडी 1949 ला जन्माली आली होती.