'मी त्याचा हात पकडला आणि...', 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीसोबत बॉडीगार्डने केलेले गैरवर्तन

' बालिका वधू या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून अविका गौरला ओळखले जाते. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती. यासाठी 2009 मध्ये तिला राजीव गांधी पुरस्कार मिळाला होता. आता नुकतंच अविका गौरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Jun 18, 2024, 15:36 PM IST

' बालिका वधू या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणून अविका गौरला ओळखले जाते. या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली होती. यासाठी 2009 मध्ये तिला राजीव गांधी पुरस्कार मिळाला होता. आता नुकतंच अविका गौरने एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

1/10

'मी त्याचा हात पकडला आणि...', 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीसोबत बॉडीगार्डने केलेले गैरवर्तन

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

2/10

आनंदी या नावाने ओळख

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

अविका गौर ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'बालिका वधू' या मालिकेत 'आनंदी' या भूमिकेतून घराघरात प्रसिद्ध झाली. बालिका वधू या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर आजही अनेक लोक तिला आनंदी या नावानेच ओळखतात.  

3/10

अविकाचा धक्कादायक खुलासा

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

अविकाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. बालिका वधू या मालिकेत झळकल्यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले. आता अविकाने एका मुलाखतीत 'धक्कादायक खुलासा केला.' 

4/10

मुलाखतीदरम्यान सांगितली घटना

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

'Hauterrfly' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अविकाने एका घटनेबद्दल सांगितले. यावेळी ती म्हणाली, 'मला माझ्या बॉडीगार्डने वाईटरित्या स्पर्श केला. यामुळे मी खूप घाबरली होती.

5/10

बॉडीगार्डकडून चुकीच्या पद्धतीने स्पर्श

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

"मी कझाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी मंचावर जात असताना मला माझ्या बॉडीगार्डने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यामुळे मला धक्का बसला", असेही अविकाने सांगितले. 

6/10

अन् मी त्याचा हात पकडला

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार घडला, त्यानंतर मी मागे वळून पाहिले. त्यावेळी माझ्या मागे माझा बॉडीगार्ड उभा असल्याचे दिसले. त्याने मला वारंवार अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण एकदा ही घटना झाल्यानंतर दुसऱ्यांदा मी त्याचा हात पकडला, असेही अविका म्हणाली. 

7/10

त्याने माझी माफी मागितली

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

मला या प्रकाराने खूपच धक्का बसला. यानंतर मी माझ्या बॉडीगार्डकडे पाहिले आणि त्याने माझी माफी मागितली. यानंतर मी काहीही न बोलता त्याला जायला सांगितले. कारण या अशा लोकांना त्यांच्या या कृत्याचा इतरांवर काय परिणाम होतो, याची काहीही कल्पना नसते, असेही तिने सांगितले. 

8/10

मी आतापर्यंत कित्येकांना मारले असते

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

अशा घटनांच्या वेळी काय करायचे असते, याची माहिती मला नव्हती. माझ्यात अजिबात हिंमत नव्हती. जर माझ्यात त्यावेळी त्याला मारण्याची  हिंमत असती, तर मी आतापर्यंत कित्येक लोकांना मारले असते, असेही ती म्हणाली.

9/10

अशी परिस्थिती कोणावर येऊ नये

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

पण आता मला असं वाटतंय की मी हे करु शकते आणि आता माझ्यासोबत हे होणार नाही.  मी आशा व्यक्त करते की अशी परिस्थिती कोणावर येऊ नये, असे अविकाने म्हटले. 

10/10

'I held his hand and...', 'Balika Vadhu' fame actress abused by bodyguard

दरम्यान सध्या अविका ही चित्रपट आणि वेब स्टोरीमध्ये झळकणार आहे. अविकाचा 'ब्लडी इश्क' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.