सलमान, शाहरुखनंतर मिथुन चक्रवर्तींना मिळाली धमकी; पाकिस्तानी डॉननं 10-15 दिवसात दिला माफी मागण्याचा सल्ला
Mithun Chakraborty Gets Threat From Pakistani Don : मिथून चक्रवर्ती यांना थेट पाकिस्तान डॉनकडून मिळाली धमकी...
Mithun Chakraborty Gets Threat From Pakistani Don : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खाननंतर आता मिथुन चक्रवर्ती यांनी धमकी मिळाली आहे. पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीनं दुबईहून त्यांना धमकी दिली आहे. त्यासोबत मिथून यांना माफी मागण्यास सांगितले आणि याशिवाय त्यांनी सांगितलं की जर असं झालं नाही तर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल. त्याचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यात मिथुन चक्रवर्ती यांना धमकी देण्यात आली आहे.
खरंतर, मिथुन चक्रवर्ती यांनी गेल्या महिन्यात उत्तर 24 परगना जिल्ह्यात एका पार्टी कार्यक्रमा दरम्यान, कथितपणे भडकवणारे भाषण दिले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली. पण मिथुन चक्रवर्ती या भाषणात असं काय म्हणाले की त्यांच्या विरोधात ही FIR दाखल करण्यात आली. 'आज मी एक अभिनेता म्हणून नाही तर 60 ज्या दशकातील मिथुन चक्रवर्ती बोलतोय. रक्तरंजित राजकारण मी फार जवळून पाहिलं असल्याने माझ्यासाठी हे डावपेच काही नवीन नाहीत. कोणती स्टेप घेतल्यानं कोणतं काम होईल हे मला चांगलचं माहित आहे. मी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासमोर हे बोलत आहे की त्यासाठी जे काही करणं गरजेचं असेल ते मी करेन. इथल्या एका नेत्यानं मला सांगितलं की हिंदूची हत्या करून त्यांना भागिरथीमध्ये वाहून देऊ. मला वाटलं होतं की मुख्यमंत्री त्यावर काही बोलतील, पण काहीच बोलले नाही, पण मी बोलतोय की तुम्हाला तुमच्याच जमिनीत पुरेन', असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले.
दरम्यान, मिथुन यांच्या याच वक्तव्यावर शहजाद भट्टी संतापला आणि त्यानं धमकी देणारा व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओत त्यानं म्हटलं की '10-15 दिवसात माफी मागा, कथितपणे ते त्या वक्तव्यात मुस्लिमांची हत्या करुन त्या जागी फेकून देणार म्हणाले.'
पुढे शहजाद हा मिथुन यांच्या चित्रपटांचा उल्लेख करत म्हणाला, 'तुम्ही आमचं मन दुखावलं आहे. तुमचे मुस्लिम चाहते आहेत. त्यांनी देखील तुमचा आदर केला आहे. तुमचा चित्रपट फ्लॉप असला तरी त्यांनी पाहिले आहेत. तुम्ही जर पोटभर खाऊ शकत आहात तर त्याचं कारण तेच आहेत. तुमच्या वयाचे लोक वायफळ गप्पा मारतात आणि त्यानंतर त्यांना यावरून पश्चाताप करावा लागतो.'
शहजाद पुढे म्हणाला, 'स्टेजवर जाऊन जे काही करत आहात, मी व्हिडीओ शूट करुन कोणाला धमकी देत नाही. हा कोणताही चित्रपट नाही खरं आयुष्य आहे. सध्या हाच सल्ला आहे की त्या लढाईविषयी विचार करु नका जी तुम्ही जिंकू शकत नाही. कारण त्यानं फक्त मान खाली होणार.'
हेही वाचा : 'हॅपी न्यू इयर' मध्ये मुलाला कास्ट करण्यासाठी निर्मात्यानं फराह खाननं दिले होते 10 कोटी?
दरम्यान, असं म्हटलं जातं की शहजाद आणि लॉरेंस बिष्णोई यांचे चांगले संबंध आहेत. त्यानं ईदच्या निमित्तानं लॉरेंसला तुरुंगात व्हिडीओ कॉल केल्याचे म्हटले जाते. त्याशिवाय त्यानं दावा केला की सलमान आणि लॉरेंस या दोघांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला.