Radhika Merchant Bag Price : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा (Nita Mukesh Ambani Cultural Centre) काल दुसरा दिवस होता. (NMACC) यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्या सेलिब्रिटींच्या फॅशन स्टाईलनं सगळ्यांचे लक्ष वेधले. तर अंबानी कुटुंब तर यात कधीच मागे राहिलेलं नाही. फक्त निता अंबानी नाही तर त्यांच्या सुना देखील फॅशनच्या बाबतीत कोणाला ऐकत नाही असं म्हणायला हरकत नाही. सध्या अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंटनं (Radhika Merchant) सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. राधिकाच्या हातातजी छोटी पर्स होती. ती पर्स छोटी असली तरी तिच्या किंमतीत सर्वसामान्य हे एक घर घेतील. चला तर जाणून घेऊया राधिका मर्चंटच्या त्या पर्स विषयी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राधिका मर्चंटनं नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी राधिकानं काळ्या रंगाची साडी नेसली होती. पण राधिकाच्या लूकमध्ये सगळ्यांचे लक्ष तिच्या बॅगनं वेधले आहे. राधिकाच्या हातात एक छोटी पर्स होती. पण तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की ती पर्स नाही तर ती एका लक्झरी ब्रॅंडची ज्वेलरी आहे. सोशल मीडियावर त्यानंतर राधिकाच्या या पर्सची चर्चा सुरु झाली आहे. पण ती ज्वेलरी असल्याचे कळल्यानंतर सगळे त्याविषयी अजून खोदून सर्च करू लागले.



किती आहे बॅगची किंमत?


‘Hermes Kelly Sac Bijou pendant with chain in silver’ या ब्रँडचं ते एक ज्वेलरी पीस असल्याची माहिती समोर आली आहे. या ज्वेलरी पीसची किंमत ही 52 लाख आहे, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडशादीडॉटकॉमनं दिलेल्या बातमीनुसार, राधिकाच्या हातात असलेल्या त्या छोट्या बॅगची किंमत ही 63,750 USD म्हणजेच 52 लाख 30 हजार आहे. यावेळी राधिका आणि अनंत या दोघांना एकत्र पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राधिका आणि अनंतनं ट्वीन केलं होतं. त्या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. 


हेही वाचा : 'खूप मद्यपान केलं की काय', Neha Pendse 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार


दरम्यान, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर याचं 31 मार्च रोजी उद्घाटनं झालं आहे. त्या दिवशी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर काल 1 एप्रिल रोजी अनेकांनी यावेळी डान्स पर्फॉर्मन्स केला. यात अभिनेता रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, रश्मिका मंदाना, किंग खान म्हणजेच शाहरुख खान, वरुण धवन यांनी देखील डान्स केला. हे कल्चरल सेंटर BKC म्हणजेच वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. या कल्चरल सेंटरमध्ये कला क्षेत्रातील कलाकारांना एक नवीन संधी मिळेल इतकंच काय तर फक्त शहारातील लोक नाही तर छोट्या शहरापासून गावातल्या लोकांनाही संधी मिळावी अशी नीता अंबानी यांची इच्छा आहे.