'खूप मद्यपान केलं की काय', Neha Pendse 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार

Neha Pendse Troll After Her New Viral Video : नेहा पेंडसेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेहानं जे केलय ते पाहुन अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशात नेहानं नक्की असं काय केलं चला तर हे जाणून घेऊया...

Updated: Apr 2, 2023, 01:16 PM IST
'खूप मद्यपान केलं की काय', Neha Pendse 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार  title=
(Photo Credit : Neha Pendse Instagram)

Neha Pendse Troll After Her New Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहानं फक्त मराठी नाही तर हिंदी, दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातही कमालीचं काम केलं आहे. नेहा पेंडसेनं गेल्या काही दिवसांपूर्वी कामावरून ब्रेक घेतला आहे. तरी देखील तिच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. नेहा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिच्या पोस्टवर तिचे चाहते लक्ष ठेवून असतात. नुकतंच नेहानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी तर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (Neha Pendse Troll)

नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नेहा एका रेस्टॉरंटमध्ये असल्याचे दिसत आहे. यावेळी तिच्या हातात काही प्लेट्स असून ती एकावर एक फोडत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहा या प्लेट्स फोडताना दिसत आहे. फक्त नेहा प्लेट्स फोडत नाही आहे तर ती आनंदी देखील आहे. हा व्हिडीओ शेअर करत नेहानं Ur girl doing things she needed to do असं कॅप्शन दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरु केलं आहे. (Neha Pendse Viral Video)

नेहाचा हा व्हिडीओ व्हायरल -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Anupam Kher यांनी श्रीदेवीची बहीण बनून अख्या मीडियाला गंडवलं होतं, फोटो पाहुन तुम्हीही चक्रावून जाल

नेहाचा हा व्हिडीओ पाहता ट्रोलर्स्नं तिला ट्रोल करण्यास सुरु केलं आहे. नेहाचा हा व्हिडीओ पाहता एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ही परदेशाची संस्कृती पाहून वाईट गोष्टी नका करू, शिकलेल्या लोकांसारखं वागा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'जर पैसे जास्त असलीत तर दान करा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'यात तुला काय मज्जा आली.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'खूप मद्यपान केलं की काय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मॅडमनं दारु जास्त पिली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'असं करताना काही वाटलं नाही. तुम्ही स्वत: साफ करणार का?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'आता ही सगळी घाण कोण साफ करणार आहे?' (Neha Pendse Instagram)