Mumbai Crime News : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या चंदू चॅम्पियन आणि भूल भुलैया 3 या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन' हा (Chandu Champion) चित्रपट 14 जूनला प्रदर्शित होत आहे. कार्तिक आर्यनची फॅन फॉलोविंग गेल्या 3 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कार्तिकला भेटण्यासाठी अनेक लोक गर्दी करत असतात. त्यातील काहीजण त्याला भेटण्यासाठी धडपड करत असतात. अशातच आता कार्तिक आर्यनला भेटण्यासाठी एका मुंबईतील महिलेची चक्क 82 लाखांची फसवणूक झाल्याची (Fraud On Kartik Aaryan Name) माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आंबोली पोलिसांनी बॉलीवूड स्टार्सशी ओळख करून देण्याच्या बहाण्याने स्टार्सच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळणाऱ्या एका भामट्याला अटक केली आहे. हा फसवणूक करणारा बॉलीवूड स्टार्सशी आपले सखोल संबंध असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत होता. आरोपीने कार्तिकशी ओळख करून देण्यासाठी 82 लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका महिलेची 2022 मध्ये कृष्णा शर्मा नावाच्या फसवणुकीने 82.75 लाख रुपयांची फसवणूक केली होती. अशातच दुसरा नवा प्रकार समोर आलाय. कार्तिक आर्यनच्या कथित चित्रपट 'लव्ह इन लंडन'मध्ये पैसे गुंतवले तर तो तिची कार्तिक आर्यनशी ओळख करून देईल, असं आश्वासन आरोपीने दिलं होतं.


कार्तिक आर्यनला भेटायला मिळतंय म्हटल्यावर महिलेने एप्रिल 2022 ते जुलै 2023 दरम्यान आरोपीने 82.75 लाख रुपये हप्त्यात जमा केले अन् फरार झाला. संपूर्ण प्रकार जेव्हा महिलेला समजला तेव्हा महिलेने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीच्या नावावर अनेक फसवणुकीचे गुन्हे देखील नोंद होते. 


दरम्यान, तपासासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले, तपासावेळी त्यांना कळलं की कृष्णाला अलीकडेच बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्याच्यासोबत त्याच्या आणखी तीन साथीदारांनाही बंगळुरू पोलिसांच्या विशेष पथकाने पकडलं होतं. सध्या पोलिस सखोल चौकशी करत आहेत.