मुंबई : अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांना गेल्या आठवड्यात निमोनिया झाल्यामुळे रूग्णालयत दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी सकाळी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. नसीरुद्दीन शाह घरी परतल्यानंतर मुलगा विवानने वडिलांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यांचे रूग्णालयातून घरी आल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विवानने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये नसीरुद्दीन शाह यांची पत्नी रत्ना पाठक देखील दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विवानने वडिलांचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी नारंगी रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. विवानने वडिलांच्या फोटोवर 'घर वापसी' असं लिहिलं आहे. नसीरुद्दीन शाह यांच्या प्रकृतीची माहिती देत विवान म्हणाला, 'आज सकाळीचं रूग्णालयातून सुट्टी मिळाली आहे.' 'बंदिश बँडिट्स' (Bandish Bandits) फेम अभिनेते शाहा यांना 29 जून रोजी रूग्णालयाद दाखल करण्यात आलं होतं.



नसीरुद्दीन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नसीरुद्दीन शाह गेल्या वर्षी 'बंदिश बँडिट्स' या वेब सीरिजमध्ये दिसले होते. या सिरीजमध्ये ते राग दरबारीच्या भूमिकेत दिसले होते. ही सिरीज प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.