`मला बाहेरच्या सोफ्यावर झोपवून...`, Nawazuddin Siddiqui च्या पत्नीनं खासगी व्हिडीओ शेअर करत केले आरोप
Aaliya Siddiqui नं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आलियानं Nawazuddin Siddiqui आणि त्याच्या कुटूंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. तिनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Nawazuddin Siddiqui Wife News : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी (Nawazuddin Siddiqui) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. नवाजुद्दीन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची घरच्यांचे आणि पत्नीमध्ये मतभेद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी नवजुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्धिकी (Mehrunisa Siddiqui) यांनी आपली सून आलियाविरोधात (Aaliya) पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता अशी बातमी समोर आली आहे की आता आलियाच्या वकिलानं नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबा विरोधात गंभीर आरोप केले आहेत. आता आलियानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रकरण सांगितले आहे.
आलियानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत आलिया सगळ्यात आधी दोन सोफे एकत्र करून तिथे झोपल्याचे दाखवत आहे. त्यानंतर तिनं संपूर्ण घर दाखवलं. हा व्हिडीओ शेअर करत आलिया म्हणाली, "गेल्या सात दिवसांपासून माझ्याच नवऱ्याच्या घरात राहायला, झोपायला परवानगी नाही. नुकतीच माझी मुलं दुबईहून परतली आहेत आणि ती माझ्यासोबत लिव्हिंग रुममध्ये दोन सोफे एकत्र करून झोपत आहेत."
पुढे आलिया सविस्तर सांगताना म्हणाली, "मी पाहुण्यांसाठी बनवलेल्या छोट्या बाथरूममध्ये अंघोळ करत आहे. मला जेवण नाही, झोप नाही आणि त्यासोबत चोवीस तास बॉडीगार्ड माझ्या आजूबाजूला आहेत. आता घरातील प्रत्येक खोलीत कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. तर त्याद्वारे माझ्यावर लक्ष ठेवले जात आहे. मला शांतता नाही आणि प्रायव्हसी देखील नाही. सातही बेडरूम माझ्या सासरच्या लोकांनी बंद केले आहेत. माझा पती नवाजुद्दीन सिद्दीकी देखील मला संरक्षण देण्यासाठी किंवा माझ्यासाठी उभा राहिला नाही."
हेही वाचा : Pathaan 'ब्रह्मास्त्र' पेक्षा मोठा ब्लॉकबस्टर? आलियानं दिलं उत्तर
आलिया पुढे म्हणाली की, "न्यायालयाच्या कागदपत्रांवर तिची सही घेण्याची परवाणगी देखील तिच्या वकिलाला देण्यात आलेली नाही. सासरच्यांकडून होणारा हा छळ कधी संपेल का? न्याय मिळण्याची प्रतिक्षा करत आहे."
जुलै 2020 मध्ये आलियाने मुंबईमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आलियाने नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात आपला जबाब नोंदवत त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. काही महिन्यांनी आलियाने नवाजुद्दीनसह असणाऱ्या आपल्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. करोनाची लागण झाल्यानंतर नवाजुद्दीन आपली आणि आपल्या मुलांची कशाप्रकारे काळजी घेत होता याबद्दल तिने सांगितलं होतं.