Neha Pendse Old Photo: अभिनेत्री नेहा पेंडसे आपल्या अभिनयानं आणि आपल्या सौंदर्यानं कायमच सर्वांनाच घायाळ करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगते. तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु नेहा ही लहानपणापासूनच हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. मराठी मालिका, हिंदी मालिका तसेच चित्रपटांतून तिनं अभिनय केला आहे. सोबतच आता ती ओटीटीवरही सक्रिय आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. अशातच आता तिचा एक जूना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सनी देओलच्या चित्रपटातील एक दृश्य सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये सनी देओलसोबत एक लहान मुलगीही दिसते आहे. ही लहान मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती नेहा पेंडसे आहे. त्यामुळे सध्या तिची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा पेंडसेनं आजवर खूप उत्तमोत्तम भुमिका केल्या आहेत. 2020 च्या जानेवारी महिन्यात तिनं शार्दूल बायस या बिझनेसमनशी लग्न केले. शार्दूलचे हे तिसरे लग्न आहे. आज ते दोघं आपल्या सुखी संसारात व्यस्त आहेत. नेहा आणि शार्दूल एकत्र ट्रीपवर जातात. याचे फोटोही नेहा अनेकदा शेअर करताना दिसते त्यामुळे त्यांचीही बरीच चर्चा रंगताना दिसते. त्यांचे फोटोही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. मध्यंतरी तिचे जपान किंवा सिंगापूर टूरचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. नेहा आपल्या हटके लुकसाठीही सोशल मीडियावर चर्चेत असते. नेहा पेंडसे आपल्या मित्रमैत्रीणींबरोबरही एन्जॉय करताना दिसते. अनेकदा ती अभिजित खांडकेकर, श्रुती मराठे, हेमांगी कवी यांच्यासह एकत्र टाईम स्पेंड करताना दिसते. हे तिचे ब्रेस्ट बीएफएफ आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. 


हेही वाचा - दिव्या खोसला कुमारच्या 'या' शॉर्ट्सची किंमत माहितीये! इतक्या पैशात दुबई टूर कराल


नेहाच्या ग्लॅमरस अदांवर सगळेच घायाळ होत असतात. नेहानं 'दाग-द फायर', 'देवदास', 'तुमसे अच्छा कौन है', 'दीवाने' यांसारख्या सुपरहीट चित्रपटांतून महत्त्वाच्या भुमिका केल्या आहेत. याशिवाय 'कॅप्टन हाऊस', 'भाग्यलक्ष्मी', 'हसरते', 'मे आय कम इन मॅडम' अशा मालिकांतूनही कामं केली आहेत. 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेतूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती. तिनं 'बिग बॉस 12' मध्येही एन्ट्री केली होती.



वर म्हल्याप्रमाणे नेहा ही लहानपणापासून या क्षेत्रात आहे. 1999 मध्ये आलेल्या 'प्यार कोई खेल नहीं' या चित्रपटात सनी देओलच्या धाकट्या बहीणीची भुमिका नेहानं केली होती. यावेळी तिनं गुड्डी या नावानं सनी देओलच्या बहीणीची भुमिका केली होती. अनेकांना आता माहितीही नसेल की ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती नेहा पेंडसे आहे. आज या चित्रपटाला 24 वर्षे उलटून गेली आहेत. नेहाचा आजचा लुक हा पुर्णपणे बदलला आहे.