Divya Khosla Kumar News: बॉलिवूडमध्ये अनेकदा चर्चा होते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या लुक्सची परंतु त्याहून जास्त चर्चा होते ती म्हणजे त्यांच्या कपड्यांच्या किमतीची. कुणी कोणत्या ब्रॅण्डचे कपडे घातले की त्यांच्याकडे लगेचच नजरा वळल्या जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगलेली आहे. तिच्या शॉर्ट पॅण्टमुळे सध्या ती भलतीच चर्चेत आली आहे. तिच्या या शॉर्ट पॅण्टची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. तिच्या या पॅण्टची किंमत जवळपास 1.5 लाख रूपये इतकी आहे. तुम्हाला कदाचित हे जाणूनही जोरात धक्का बसेल. या अभिनेत्रीचं नावं आहे दिव्या खोसला कुमार. तिच्या पॅण्टची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया तिच्या या पॅण्टची नक्की खासियत आहे तरी काय?
आपल्याला माहितीच आहे की दिव्या खोसला कुमार हिचा फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. टी-सिरिजचे मालक भूषण कुमार यांची ती पत्नी आहे. ओटीटीवरही ती सक्रिय असते. कोट्यवधींची मालकीण असलेली दिव्या ही प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर दिसते. तिचे आऊटफिट्स तर कायमच चाहत्यांना भुरळ घालताना दिसतात. त्यामुळे तिची प्रचंड प्रमाणात चर्चा रंगते.
मध्यंतरी ती एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. तेव्हा तिच्या ब्राऊन रंगाच्या शॉर्ट्सनी सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे तिची फारच चर्चा होती. आता तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली यासाठी की तिच्या या शॉर्टची किंमत ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
हेही वाचा - EXCLUSIVE: लेक 'बाईपण भारी देवा'मधून करणार पदार्पण? सुकन्या मोने म्हणतात, ''मला माहितीच नव्हतं...''
दिव्यानं यावेळी मायक्रो शॉर्ट्स आणि प्लेन टी-शर्ट घालून फीट बॉडी फ्लॉट केली होती. यावेळी तिनं व्हाईट कलरचे शूट्ज परिधान केले होते. सोबतच व्हाईट कलरची टी घातली होती आणि हातातही व्हाईट रंगाची बॅग परिधान केली होती. ती केस मोकळे सोडले होते आणि चेहऱ्यावर गॉगल लावला होता. तिनं हातात घेतलेल्या लेदर वेस्टबॅंड असलेल्या ब्राऊन शॉट्रसची किंमत ही 2100 डॉलर इतकी आहे.
हे GUCCI या ब्रॅण्डचे शॉर्ट्स आहेत. त्यामुळे भारतीय चलनाच्या तुलनेनं याची किंमत ही 1,72,469 रूपये इतकी आहे. तिच्या बॅगची किंमत ही 3100 डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच एकूण 2,54,483 रूपये इतकी आहे. तर तिनं जे शूज घातले होते त्यांची किंमत ही 995 डॉलर म्हणजेच 81,677 रूपये इतकी होती.