Deepika Padukone नंतर या अभिनेत्रीनं परिधान केली भगव्या रंगाची बिकीनी, फोटो Viral
Actress चा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपिकाच्या भगव्या बिकिनी लूकनंतर तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
Neha Sharma On Deepika Padukone's Besharam Song's Bikini : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) भगवा बिकिनी लूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 'बेशरम रंग' (Besharam Rang) हे गाणं सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं आहे. दीपिकाला तिच्या 'बेशरम रंग' गाण्यामुळे ट्रोल करणाऱ्यांमध्ये अनेक मोठ्या लोकांची नावे आहेत. मात्र, भगव्या रंगाच्या बिकिनीसाठी तिला ट्रोल केले जात असताना, तशाच रंगाची बिकिनी याआधीही अनेक अभिनेत्री परिधान केली आहे. भगव्या रंगातील त्यांचे बोल्ड लूक सतत व्हायरल होत आहेत. या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले जात आहे. या अभिनेत्रीचे नाव नेहा शर्मा (Neha Sharma) आहे. नेहा शर्मानं समुद्र किनाऱ्यावरील तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेहानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. नेहाचे हे फोटो गोव्याचे आहेत. गोव्याच्या बीचवर नेहानं भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचे हे बोल्ड फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. या फोटोंमध्ये नेहानं भगव्या रंगाची हॉल्टर नेक बिकिनी परिधान केली आहे. यासोबतच तिनं ब्लॅक आणि बेज प्रिंटेड श्रग परिधान केलं आहे. नेहाचा हा नो मेकअप लूक आहे. समुद्र किनाऱ्यावर नेहा मस्ती करत असल्याचे दिसत आहे. याशिवाय नेहानं फुलाचे फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. नेहाच्या कर्वी फिगरनं प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत. अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट करत तिला हॉट म्हटले आहे.
नेहा तिचा आगामी चित्रपट 'जोगिरा सारा रा रा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाशिवाय नेहाचा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहा या आधी अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये देखील दिसली आहे.
काय आहे भगव्या रंगाचा वाद
'बेशरम रंग' गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून हा वाद सुरु झाला आहे. या वादात अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य (Sant Paramhans Acharya) यांनी शाहरुख खानला धमकी दिली आहे. शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी धमकी देण्यात आलीय.भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत.(neha sharma wear orange bikini after deepika padukone besharam rang song from pathaan controversy)