`लुका छुपी` सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित
अनेक हिट गाण्यांची मेजवानी असलेले हे गाणे गायक टोनी कक्कर आणि गायक नेहा कक्कर या भावंडांनी गायले आहे.
मुंबई: अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृति सेनन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'लुका छुपी' सिनेमातील दुसरे गाणे चाहत्यांच्या भेटीस आले आहे. 'लुका छुपी' सिनेमाच्या माध्यामातून ही जोडी पहिल्यांदाच चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'कोका कोला' असे नवीनच प्रदर्शित झालेल्या गाण्याचे बोल आहेत. अनेक हिट गाण्यांची मेजवानी असलेले हे गाणे गायक टोनी कक्कर आणि गायक नेहा कक्कर या भावंडांनी गायले आहे. मूळ 'कोका कोला' या गाण्याला गायक टोनी कक्करच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. यू ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्याला चार लाखांपेक्षाही जास्त वेळा पाहिले आहे. कृति सेनन 'कोका कोला' हे गाणे ट्विटरवर शेअर केले.
नुकताच सिनेमाचा ट्रेलर आणि पहिले गाणे प्रदर्शित झाले. 'ये खबर छपवा दो अखबार में, पोस्टर लगवा दो बाजार में' असे या गाण्याचे बोल असून अभिनेता अक्षय कुमार आणि उर्मिला मातोंडकर यांच्या 'अफलातून' सिनेमाचे रिमेक आहे. गाण्यात कार्तिक-कृति यांनी अक्षय-उर्मिला यांच्या पावलावर पाउल ठेवल्याचे दिसून येत आहे. गाण्यात कार्तिक-कृति यांची जोडी कमालीची दिसत आहे. गायक मिका सिंग आणि सुनंदा शर्मा यांनी हे गाणे गायले आहे.
बोल्ड विनोदी असलेल्या 'लुका छिपी' सिनेमाची गोष्ट ट्रेलरच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर आली. सिनेमात कार्तिक-कृति लिव-इन मध्ये राहत असतात. नंतर त्यांच्या घरातल्यांचा त्यांनी पळुन लग्न केले असल्याचा गैरसमज होतो. त्यानंतर हे दोघे कुटुंबात एका जोडप्याप्रमाणे राहतात. सिनेमाची निर्मिती दिनेश विज़ान यांनी केली आहे. १ मार्च रोजी 'लुका छिपी' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.