Sunny Deol Son Karan Deol: मागील महिन्यात अभिनेता सनी देओल यांचा मुलगा करण देओल हा विवाहबंधनात अडकला होता. त्याच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. त्याच्या आणि द्रिशा आचार्याचे फोटोही जोरात व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नाला आजोबा धर्मेंद्र यांनीही मनसोक्त डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. त्यानंतर ते हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला गेले होते आणि त्यांच्या हनिमूनचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. आपल्या हनिमूनवरून दोघंही परत आले आहेत आणि यावेळी ते एअरपोर्टवरही स्पॉट झाले आहे. त्या दोघांनी ट्विनिंग कपडे घातले होते आणि त्यांच्या या कॅज्युअल आऊटफिटचीही चांगलीच चर्चा रंगली होती. परंतु लक्ष्मी नारायणासारखा दिसणारा हा जोडा मात्र सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण देओलच्या लग्नांच्या चर्चांमध्ये त्यांच्या लग्नातले अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. आता त्यानंतर ते थेट आता एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांचीच चर्चा रंगली आहे. परंतु त्यांच्या आऊटफिटवरून नाही तर यावेळी वेगळ्याच एका कारणासाठी ते दोघंही ट्रोल झाले आहेत. यंदा करण देओलच्या पत्नीला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे दिसते आहे. यावेळी त्या दोघांची जोडी अजिबात चांगली दिसत नाही असे काही नेटकऱ्यांनी जाहीरच करून टाकले आहे. त्यातून काहींना दिशाच्या रूपावरून तिला ट्रोल केलं आहे. ती फार म्हातारी दिसते आहे. त्यामुळे तिच्यावर टीका टिप्पणी करण्यात आली आहे. अशावेळी मात्र ती दोघं फारच मिस्चमॅच्ड दिसत आहेत, अशा अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 


हेही वाचा - राम गोपाल वर्माच्या 'त्या' वक्तव्यामुळे पुन्हा रणकंदन पेटणार... आता तर कहरच केला!


यावेळी काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे त्यांचे फोटो हे त्यांच्या चाहत्यांमध्ये व्हायरलही झाले आहेत. परंतु अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. 12 जूनपासून त्यांच्या लग्नविधींना सुरूवात झाली होती. त्यांची रोका सेरेमनी संपन्न झाल्यानंतर आता त्यांच्या हळदी आणि लग्नसभारंभांच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचे लग्न पार पाडले आणि ते हनिमूनसाठी रवाना झाले. यादरम्यान त्यांनी काही फॅमिली फोटोही शेअर केले होते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सनी देओल यांचा 'गदर 2' हा चित्रपटही प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे या चित्रपटाचीही चांगलीच चर्चा आहे. 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.