ट्रोलर्सने करिनाला असे शब्द वापरले, `या` शब्दाचा कोणत्याही महिलेला राग येईल
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेहनत करतात.
मुंबई : आज 21 जून रोजी संपूर्ण जग योगा दिन साजरा करत आहे, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मेहनत करतात. अशा परिस्थितीत आज हे स्टार्स सातत्याने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशा परिस्थितीत बॉलिवूडची बेबो करीना कपूर खाननेही काही वेळापूर्वी तिचा योगा करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आणि हा फोटो पोस्ट केल्यानंतर, करिना खूप ट्रोल झाली. करिनाने बिना मेकअप हा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तिला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत करीना कपूर खानने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''माझ्यासाठी योगाचा प्रवास 2006 मध्ये सुरू झाला होता, या दरम्यान मी 'टशन' आणि 'जब वी मेट'हे सिनेमा साईन केले होते. योगाने मला एक वेगळी शक्ती दिली आणि मीसुद्धा फिट झाले. आता दोन मुलांना जन्म दिल्यानंतर मी पूर्णपणे थकली आहे, यामुळे मी हळूहळू योगाकडे परत वळत आहे. माझा योग वेळ माझा वेळ आहे, निश्चितच सुसंगतता महत्वाची आहे. योगा करत रहा''
करिनाने शेअर केलेल्या फोटोमुळे ती ट्रोल होत आहे. फोटोवर लिहिलेल्या कमेंन्ट्स खूप विचित्र आहेत. काही नेटकऱ्यांनी करिनाच्या फोटोवर असं लिहिलं आहे की, तिचा चेहरा पाहून तिने काही अंमली पदार्थाचं सेवन केलं असल्याचं दिसत आहे. कर काहिंनी ती खूप म्हातारी दिसत असल्याचं म्हटलं आहे. तिच्या फोटोवर कमेंन्ट करत एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की, 'वाह दादी वाह' ज्यामुळे ती आता बरीच ट्रोल झाली आहे.
करिनाने थोड्या वेळापूर्वी सैफ आणि तैमूरचे योग फोटोही पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ही वडील मुलाची जोडी खूपच क्यूट दिसत आहे.
करिनाने सांगितलं की, तिने स्वत: ला पुन्हा तंदुरुस्त करण्यासाठी योगा करायला सुरुवात केली आहे. ज्यामुळे काही महिन्यांत तिचा चेहरा पुन्हा चमकेल. करीना कपूर खान बॉलिवूडची एक मोठी नायिका आहे. लवकरच करिना आमिर खानच्या 'लालसिंग चढ्ढा' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.