Mirzapur 3 Actor on Acting With Amitabh Bachchan : 'मिर्जापुर 3' च्या 'दद्दा त्यागी' उर्फ लिलिपुट नावानं ओळखले जाणारे बॉलिवूड अभिनेता एम एम फारुकी स्वत: ला अपशकुनी समजू लागले होते.  एकामागे एक अमिताभ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट बंद होत होते. त्यामुळे त्यांना वाटू लागलं की ते अपशकुनी आहेत. त्यांच्या मनात असलेली एक गोष्ट त्यांनी अमिताभ बच्चन यांना देखील सांगितली आणि त्यांच्यासोबत चित्रपट करण्यासही नकार दिला होता. याविषयी एम एम फारुकी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विषयी एम एम फारुकी यांनी 'बॉलिवूड ठिकाना' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्यांनी म्हटलं की मी पत्ते खेळत होतो आणि मला सुभाष घई यांचा फोन आला. त्यांनी मला ऑफिसमध्ये येऊन भेट असं सांगितलं होतं. त्यावेळी माझ्याकडे वांद्रेपर्यंत जाण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे ज्या लोकांसोबत मी पत्ते खेळत होतो, त्यांच्यापैकीच एकानं मला तिथे सोडलं. मग सुभाष जींनी मला सांगितलं की मी एक चित्रपट बनवणार आहे, शेरबहादुर आणि त्यात अमिताभ ही हीरो असतील आणि तुमची खलनायकाची भूमिका असेल. 


पुढे त्या प्रोजेक्टविषयी बोलताना एम एम फारुकी म्हणाले, 'सुभाष जींनी मला सांगितलं की माझ्या चित्रपटाआधी तुमचा कोणताही चित्रपट हा प्रदर्शित व्हायला नको. तुमची ती इमेज जर तयार झाली नाही तर तुम्ही जे काही प्रोजेक्ट्स करत आहात ते तुम्हाला सोडावे लागतील.' सुभाष घईंच्या यांनी त्यांचे प्रोजेक्ट्स सोडले आणि मग त्याच्या त्यांना मोठा फटका बसला.


हेही वाचा : 'गरोदर राहिले तर...' रेखानं पतीसमोर ही अट ठेवली आणि....


पुढे त्यांनी सांगितलं की 'अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक नसल्यानं सुभाष घईंचा तो चित्रपट झालाच नाही. तेव्हा एकदा लिलीपुट यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितलं की 'माझ्यासोबत अभिनय करण्याचा प्रयत्न करु नका'. तरी देखील लिलीपुट यांच्यासोबत काम करण्याची आणखी एक संधी आली होती. त्या चित्रपटाचं नाव 'आशियाना' आहे. पण मग काही  कारणामुळे हा चित्रपट देखील होऊ शकला नाही. त्यानंतर लिलीपुट यांना अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची ऑफर मिळाली. हा चित्रपट होता 'बंटी और बबली'... त्यावेळी त्यांनी दिग्दर्शक शाद यांना सांगितलं की 'मी अपशकुनी आहे, अमिताभ जींसोबत माझे चित्रपट होतंच नाही, तुमचा देखील चित्रपट होणार नाही.' पण हा चित्रपट झाले आणि लोकांना आवडले देखील.'