Parineeti chopra : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नासाठी त्या दोघांचे चाहते उत्सुक आहेत. प्रियांकाची लाडकी बहीण परिणीति लवकरच सप्तपदी घेणार आहेत. परिणीति आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असली तरी तिनं करिअरची सुरुवात कशी केली याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. प्रियांकाची बहीण असली तरी देखील परिणीतिनं तिच्या करिअरची सुरुवात ही अभिनयापासून नाही तर पीआर कन्सल्टंट म्हणून केली होती. परिणीतिनं बहीण प्रियांका चोप्राच्या 'प्यार इम्पॉसिबल ' या चित्रपटासाठी पीआर म्हणून काम केलं होतं. प्रियांकानेच तिला हे काम करण्याचा सल्ला दिला होका. प्रियांकामुळे परिणीति चोप्राचं हे स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिणीति चोप्रानं करिअरच्या सुरुवातीला यशराज बॅनर्ससोबत झालं. या बॅनरच्या अंतर्गतचं तिला चित्रपट करण्याची संधी मिळाली. त्यावेळी चित्रपटाच्या सक्सेसची जबाबदारी ती सांभाळत होती. एकदा आस्क मी एनिथिंग सेशन दरम्यान, त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते तेव्हा तिनं खुलासा केला होता की तिनं यशराज बॅनर्सच्या अंतर्गत अनुष्का शर्मासाठी बॅन्ड बाजा बारात चित्रपटासाठी पीआर केलं होतं. त्याच्या तीन महिन्यानंतर तिला अनुष्का शर्मासोबत सह-कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. 



पीआर कंसल्टंटचं काम करत असताना परिणीतिनं कधी विचार केला नव्हता की मोठ्या पडद्यावर ती असं काम करू शकेल. यशराज बॅनर अंतर्गत तिची भेच दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्याशी झाली होती. तेव्हा त्यांना वाटलं की परिणीति ही अभिनय करू शकते. त्यानंतर दिग्दर्शक मनीष शर्मानं तिला तीन चित्रपटांसाठी साइन केलं आणि लेडीज वर्सेस रिक्की बहल या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर परिणीति चोप्रामध्ये असलेली मस्ती आणि चित्रपटाला मिळालेल यश पाहून तिला एकामागे एक चित्रपट मिळत गेले. 



हेही वाचा : 'हे आपले खरे संस्कार...', मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पासाठी किरण मानेंची खास पोस्ट


परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे त्यांच्या लग्नासाठी उदयपुर पोहोचले आहेत. त्यांच्या लग्नाच्या आधीचे कार्यक्रम हे दिल्लीतील राघव चड्ढाच्या घरी झाले. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांमध्ये सोफी नाईट देखील होती. त्याचे अनेक फोटो समोर आले होते. त्या गुरुद्वारेतील अरदासचे फोटो समोर आले होते.