डॉन घेऊन येणार `मुहम्मद- द मेसेंजर ऑफ गॉड`
दर्जेदार आणि तितक्याच लोकप्रिय कलाकारांनी या चित्रपटात आपलं योगदान दिलं आहे.
मुंबई : ऑस्कर नामांकित ईराणी दिग्दर्शक मजिद मजीदी यांचा चित्रपट 'मुहम्मद- द मेसेंजर ऑफ गॉ़ड' हा चित्रपट डॉन सिनेमाद्रावा प्रदर्शित करण्यात येणार आहे. जून महिन्यात डॉन सिनेमाच्या विविध ओटीटी प्लॅटफॉ़र्मवर सहा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
दर्जेदार आणि तितक्याच लोकप्रिय कलाकारांनी या चित्रपटात आपलं योगदान दिलं आहे. ज्यामध्ये मजीदींच्या दिग्दर्शनाव्यतिरिक्त ऑस्कर विजेता संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ईदच्या निमित्तानं डॉन सिनेमाकडूनहा एक या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात येणार आहे.
डॉन सिनेमाच्या संस्थापक महमूद अली यांच्या म्हणण्यानुसार हा एक असामान्य असा ईराणी चित्रपट आहे. जवळपास ३०० कोटींच्या निर्मिती खर्चात हा चित्रपट साकारण्यात आला आहे. एका मोठ्या स्तरावर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा कलाकार, निर्माते आणि डॉन सिनेमाचाही मानस आहे.
मजिद मजीदी हे त्यांच्या अनोख्या दिग्दर्शन शैलीसाठी ओळखले जातात. ईराणी, इंग्रजी आणि हिंदी चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या अनेक चित्रपटांना आजवर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'बियॉण्ड द क्लाऊड्स' या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं.