मुंबई : संजय लीला भंसाळी यांचा बहुप्रतिक्षित 'पद्मावती' हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचा ट्रेलर आणि घुमर या गाण्याला रसिकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. यासोबतच काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. 



करणी सेना आणि राजपूत संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे निर्मात्यांकडून तयारी अधिक जोमाने केली जात आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा १६० करोडचा विमा उतरवला गेला आहे. त्यानंतर आता एक नवीन पोस्टर आले आहे. 


नव्या पोस्टरवर दीपिकाचा लूक अनेकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. पण त्यासोबतच तारीख  पाहून अनेक चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. 



दीपिकाच्या नव्या पोस्टरवर ३० नोव्हेंबर तारीख असल्याने हा चित्रपट प्री पोन करणार क्का ? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला आहे. पण पद्मावती हा जगभर रिलीज होत आहे. त्यानुसार गल्फ भागात चित्रपट गुरूवारी रिलीज करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तेथील पोस्टरवर गुरूवार म्हणजे ३० तारीख प्रिंट करण्यात आली आहे. त्यामुळे हा गोंधळ झाला आहे. 


पद्मावती हा चित्रपट ३ डी स्वरूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.