Palak Tiwari and Ibrahim Ali Khan: अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीचं नाव सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अलीसोबत जोडण्यात येतं. गेल्या बऱ्याच काळापासून तिच्या अफेयरची चर्चा सुरु असते. पलक आणि इब्राहिमला अनेकदा एकत्र पाहिलं आहे. पलकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. यावेळी पलकनं इब्राहिमसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ कननच्या शोमध्ये पलकनं हजेरी लावली होती. यावेळी पलकनं इब्राहिमसोबतच्या नात्याविषयी सत्य काय आहे हे सांगत खुलासा केला की मी आणि इब्राहिम फक्त पब्लिक आणि सोशल गॅदरिंग्समध्ये भेटतो. आम्ही दोघं संपर्कात राहत नाही आणि इब्राहिम मला मेसेज देखील करत नाही.



पुढे सात मुलांसोबत नाव जोडण्याविषयी सांगत पलक म्हणाली, 'तिचं नाव हे सात मुलांसोबत जोडण्यात आलं होतं. मीडियानुसार, ती त्या सगळ्यांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण असं काही नाही. पलकनं पुन्हा सांगितलं की इब्राहिम अली खान तिचा मित्र आहे. तिला त्याची कंपनी खूप आवडते. त्याच्यासोबत राहणं तिला आवडतं. एक व्यक्ती म्हणून इब्राहिम मला आवडतो. आमच्यात रिलेशनशिपसारखं काही नाही. तो त्याचं काममध्ये योग्य आहे आणि लवकरच पदार्पण करणार आहे.'


काही दिवसांपूर्वी अबू जानी आणि संदीप खोसगाच्या दिवाळी पार्टीत जेव्हा इब्राहिम पोहोचलो तेव्हा पलक देखील त्यांना भेटायला गेली होती. इब्राहिमनं पलक तिवारीला मिठी मारली. इतकंच नाही तर इब्राहिमन पलकला तमन्ना भाटिया आणि विजय वर्माशी देखील भेट घालून दिली. पलक तिवारी आणि इब्राहिम हे कथित कपल असले तरी सोशल मीडियावर त्यांच्याविषयी सतत चर्चा या होतात. ते कपल नसले तरी त्यांची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. 


हेही वाचा : 'बिग बॉस 18' मध्ये बोल्डनेसचा तडका; कर्दाशियन बहिणींची घरात एन्ट्री?


पलक आणि इब्राहिमच्या कामाविषयी बोलायचं झालं तर पलकनं सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर इब्राहिमनं आधी असिस्टंट म्हणू रॉकी और राणीकी प्रेम कहाणी या चित्रपटासाठी काम केलं. आता एक अभिनेता म्हणून 'सरजमीं' या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.