मुंबई : परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण हा सिनेमा अनेक अडथळे पार करून अखेर 25 मे रोजी रिलिज झाला आहे. जॉन अब्राहम आणि डायना पेंटी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावत आहेत. अनेक दिवसांनी अभिनेता जॉन अब्राहम रूपेरी पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटातून त्याने पुन्हा दमदार एन्ट्री घेतली आहे.  


कोटींची कमाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण हा सिनेमा सत्य कहाणीवर अवलंबून आहे. 1998 साली भारताचा न्युक्लिअर पॉवर असलेल्या देशामध्ये समावेश कसा झाला? यावर चित्रपटाची कहाणी अवलंबून आहे. भारतीय जवानांचा हा जिद्दीचा थरारक प्रवास रूपेरी पडदयावर साकारण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर हळू सुरवात केली असली तरीही दिवसाअखेर पकड घेतली आहे. 


तरण आदर्शचं खास ट्विट 


तरण आदर्श या ट्रेन्ड अ‍ॅनालिस्टच्या ट्विटनुसार, परमाणू चित्रपटाने पहिल्या दिवशीच सुमारे 4.82 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा एकूण 1935 स्क्रिन्सवर झळकला आहे. 


 



अभिषेक शर्माचं दिगदर्शन 


जॉन अब्राहमच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्माने केले आहे. तर हा सिनेमा जॉन अब्राहमच्या प्रोडक्शन हाऊसद्वारा निर्मित करण्यात आला आहे. यापूर्वी जॉनने 'विकी डोनर', 'मद्रास कॅफे' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. वाचा परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण सिनेमाचा रिव्ह्यू