Shah Rukh Khan चा बॉक्स ऑफिसवर धमाका, 500 कोटी कमावणारा `Pathaan` बॉलिवूडचा पहिला चित्रपट
Pathaan Box Office Collection: Shah Rukh Khan स्टार `पठाण` हा आतापर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे.
Pathaan Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता आणि सर्वांचा लाडका किंग खान (Shah Rukh Khan) म्हणजेच शाहरुख खानचा पठाण (Pathaan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'पठाण'नं (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडीस काढलेत. सुरूवातीला चांगल्याच वादात सापडलेल्या चित्रपटाचं सगळीकडेच कौतूक होताना दिसतंय. अशातच आता शाहरूखच्या पठाणने बॉक्स ऑफिसवर (Box Office) धमाका केला आहे. (Pathaan Box Office Collection day 22 first Bollywood film to earn 500 crores know details)
किंग खानचा धमाका
वीकेंडच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा हा चित्रपट आठवडाभर देखील आपली जादू दाखवत आहे. वर्किंग डे्स मध्ये देखील पठाणला चांगली पसंती मिळालीये. त्यामुळे आता पठाणने नवा रेकॉर्ड (Pathaan Box Office Collection) नावावर केला आहे. 500 कोटी कमावणारा पठाण हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला आहे. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 22 व्या (pathaan box office day 22) दिवशी 500 कोटींचा टप्पा पार केला.
बाहुबली 2 चा रेकॉर्ड मोडणार?
पठाण सध्या मोठ्या पडद्यावर कल्ला करत असताना लवकर तो बाहुबली सिनेमाचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. बाहुबली 2 ची कमाई 511 कोटी इतकी होती. त्यामुळे आता पठाण बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. पहिल्या दिवशी पठाणने 57 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसरा दिवस देखील पठाणने गाजवला. दुसऱ्या दिवशी पठाणने 71 कोटींची उडी घेतली. त्यामुळे आता पठाणच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष आहे.
आणखी वाचा - Pathaan Leaked Online : शाहरूखचा पठाण लीक, 'या' साईट्सने केला दावा!
दरम्यान, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात पठाण चांगली कमाई करताना दिसतोय. वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये देखील दिवसेंदिवस चांगला झळकताना दिसतोय. चित्रपटाने जगभरात तब्बल 950 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता 1000 कोटींचा टप्पा लवकरच पठाण पार करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता किंग खानने पुन्हा एकदा दमदार कमबॅक केल्याचं पहायला मिळतंय.