मुंबई : 2019 नंतर शाहरुख Pathaan या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. जिथं अनेकांनीच आता शाहरुखनं आता माघार घ्यावी, आता तो HERO वाटत नाही... असं म्हणत त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाकडे इशारा केला त्यांच्यासाठी ही चपराक ठरली. कारण, प्रदर्शित झाल्या क्षणापासून किंग खानच्या या चित्रपटानं अविश्वसनीय कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), डिम्पल कपाड़िया (Dimple Kapadia) आणि आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणआऱ्या या चित्रपटाची जादू प्रदर्शनानंतर सलग 37 व्या दिवशीही कायम आहे. आजही ज्यांना हा चित्रपट पाहिला नाही त्यापैकी काहीजण पश्चाताप करत आहेत तर काही चाहते थेट चित्रपटगृहांची वाट धरतना दिसत आहेत. 


25 जानेवारीला रिलीज झालेला 'पठाण' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली.  एका अहवालानुसार, आता महिनाभरानंतर पठाणांच्या संकलनात थोडीशी घट झाली आहे. चित्रपटाने 37व्या दिवशी 75 लाखांची कमाई केली. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता 528.77 कोटींवर गेली आहे. शाहरुखच्या चित्रपटाने ३६व्या दिवशी ७१ लाखांचा गल्ला जमवला.


पठाण हा YRF Spy Universe चा चौथा चित्रपट आहे.
शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी पहिल्यांदाच पठाणमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक सिद्धार्थ आनंद आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आला आहे. YRF Spy Universe चा हा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. यापूर्वी, तो 2018 मध्ये 'झिरो'मध्ये दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर आपत्ती ठरला होता. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी तमिळ आणि तेलगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.


बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) बॉक्स ऑफिसवर (Box Office) जबरदस्त कमबॅक केलं आहे. तब्बल चार वर्षांनी पठाणच्या (Pathaan) निमित्ताने पुन्हा आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर परतल्यानंतर शाहरुख खानने इतिहास रचला आहे. 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई (Pathaan Box Office Collection) केली आहे.