Indian Idol 12 : अरूणिता कांजीलालसोबत असलेल्या नात्यावर पवनदीप राजनचा मोठा खुलासा
Indian Idol शो आता अंतिम टप्प्यावर येवून पोहोचला आहे.
मुंबई : सिंगिंग रियलिटी शो (Singing Reality Show), इंडियन आयडल 12 ची (Indian Idol 12) सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली असते. जेव्हा शोची सुरूवात झाली तेव्हापासून अरूणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या. शो मेकर्सद्वारा त्यांच्या नात्याला लव्ह एँगल देण्यात आला. त्यांच्या एँगलची सोशल मीडिया टीका देखील करण्यात आली. पण शेवटपर्यंत या दोघांच्या जोडीने आणि गोड आवाजाने सर्वंचं लक्ष वेधून घेतलं.
महत्त्वाचं म्हणजे शो आता अंतिम टप्प्यावर येवून पोहोचला आहे. तेव्हा पवनदीपने अरूणितासोबत रंगलेल्या चर्चांना पूर्णविरा दिला. पवनदीपने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. पवनदीप म्हणाला, 'अरूणिता आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा लव्ह एँगल नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र प्रचंड वेळ व्यतीत करतो. त्यामुळे सर्व कंटेस्टंट्समध्ये घट्ट नातं आहे.'
तो पुढे म्हणाला, 'कालांतराने सर्वांना सत्य कळून जाईल. माझ्या आणि अरूणितामध्ये मैत्री शिवाय काही नाही. आता फक्त करियरवर लक्ष केंद्रीत करायला हवं. प्रेम वैगरे या सर्व गोष्टीनंतर देखील होत राहतील. ' असं म्हणत पवनदीपने अरूणितासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला.
पार्श्वसंगीतासाठी पवनदीप तयार
सांगायचं झालं तर पवनदीप 2015 साली 'द वॉयस' शोचा विजेता ठरला होता. आता इंडियन आयडलमध्ये येण्याचं कारण वियजी होणे नव्हतं तर नवं काही तरी शिकण्याची इच्छा होती. आता पवनदीपला पूर्ण विश्वास आहे की तो पार्श्वसंगीतासाठी तयार झाला आहे.