सलमान कडून कतरिनाचं भरभरुन कौतुक मात्र `या` एक्स गर्लफ्रेंन्डचा तिरस्कार?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान नुकताच शो `पिंच`मध्ये पोहोचला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान नुकताच आपला भाऊ अभिनेता अरबाज खानचा शो 'पिंच'मध्ये पोहोचला होता. या कार्यक्रमात पोहोचून त्याने स्वत:बद्दल अनेक खुलासे केले आहेत. अरबाज खानने सलमान खानला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरेच प्रश्न विचारले आहेत. 'पिंच २'च्या फास्ट फायर फेरीत अरबाज खानने सलमान खानला कतरिना कैफ आणि संगीता बिजलानीबद्दलही बरेच प्रश्न विचारले.
अरबाजने सलमानला विचारलं की, 'बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीला तुम्हाला सोशल मीडियावर सहकलाकार बनवायला आवडेल?' या प्रश्नाच्या पर्यायात सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ आणि दिशा पटानी यांची नाव होती. या प्रश्नाच्या उत्तरात सलमान खानने कतरिना कैफचं नाव चॉईस केलं. सलमान म्हणाला की, कतरिना सोशल मीडियावर खूप समजूतदारपणे असते. यासोबतच सलमानने हा खुलासाही केला की, त्याने आपलं सोशल मीडिया अकांउन्ट मॅनेज करण्यासाठी एक टीम ठेवली आहे. आणि ट्विटरवर पोस्ट टाकण्याआधी त्याची प्रत्येक पोस्ट त्याच्या कायदेशीर टीमद्वारे तपासली जाते.
इंस्टाग्रामवर सलमान खानचे 42 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, पण तो एकूण 27जणांनाच फॉलो करतो. अशा परिस्थितीत अरबाज खानने त्याला विचारलं की, अथिया शेट्टी, संगीत बिजलानी आणि कतरिना कैफ या तिघींपैकी कोणत्या अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर फॉलो करायला आवडत नाही? या प्रश्नाला उत्तर म्हणून सलमान खानने आपली एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचे नाव घेतलं. याशिवाय सलमान खानने इतरही अनेक खुलासे केले.
अलीकडेच अरबाज खानचा चॅट शो पिंचचा दुसरा सीझन सुरू झाला आहे. त्यांच्या या कार्यक्रमाचा पहिला पाहुणा म्हणजे त्याचा भाऊ आणि दिग्गज अभिनेता सलमान खान. भाऊ अरबाज खानच्या कार्यक्रमात पोहोचल्यानंतर सलमान खानने आपल्या फिल्मी करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.
चॅट शो 'पिंच'मध्ये पोहोचल्यानंतर बरेच चित्रपट स्टार आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करत असतात. अरबाज बॉलिवूड स्टार्सबरोबर सोशल मीडियाबद्दल स्पष्टपणे बोलतो. या शोमध्ये, स्टार्स त्यांच्याविरूद्ध बोलणार्या कमेंन्टवर आपलं मत मांडतात.