Pooja Bhatt Congress Party : आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी झगमगत्या विश्वाला राम राम ठोकत राजकारणात प्रवेश केला. आता बॉलिवूडच्या (Bollywood) मोठ्या कुटुंबातील लेक राजकारणाच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (congress party bharat jodo yatra) सहभागी झाली आहे. सध्या ही यात्रा तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे पोहोचली असून, या यात्रेत पूजा भट्टसह काँग्रेस नेते राहुल गांधीही (Congress leader Rahul Gandhi) सामिल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींसोबत पूजा भट्टही या यात्रेत सामील झाल्या आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भट्ट पक्षाचे नेते राहुल गांधींसोबत कोणत्यातरी विषयावर बोलताना दिसत आहेत. सध्या राहून गांधी आणि पूजा भट्टा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (pooja bhatt)


(Congress party)महत्त्वाचं म्हणजे यात्रेत सहभागी होणारी पहिलं व्यक्तिमत्त्व म्हणजे पूजा भट्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी अभिनेत्री काळ्या रंगाचा फुल स्लीव्हज कुर्ता आणि प्रिंटेड स्टोल घेतलं आहे. 



एवढंच नाही तर, अभिनेत्रीची एक झलक  पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील मोठी गर्दी केली. सध्या पूजा भट्टच्या फोटोंची सर्वत्र चर्चा रंगत आहेत. सिनेसृष्टीतील एक नावाजलेले नाव म्हणजे पूजा भट्ट. महेश भट्टची मोठी मुलगी, मॉडल आणि त्याचबरोबर व्हाईस आर्टिस्ट इंडस्ट्रीमध्ये तिने आपली चांगली ओळख बनवली.