मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) ही गेल्या काही दिवसांपासून ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ (Chup: Revenge of The Artist) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पूजा सध्या व्यस्त आहे. दरम्यान, एका मुलाखतीत तिला Bombay Begums या सीरिजमुळे मिळालेल्या कौतुकाबद्दल सांगितले आहे. यावेळी विद्दा बालनं (Vidya Balan) विषयी बोलताना पूजा भट्ट म्हणाली. 


आणखी वाचा : आलियाला हवीत २ मुलं? बाळंतपणाआधीच मुलांचं भाकीत..रणबीरही म्हणतो ट्विन्स..नक्की मामला काय पाहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2021 मध्ये, पूजानं नेटफ्लिक्स कार्यक्रम ‘बॉम्बे बेगम्स’ (Bombay Begums ) मधून दोन दशकांनंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. कामाच्या ठिकाणी होणारा छळ, संस्थेतील राजकारण आणि लैंगिकता अशा बऱ्याच गोष्टींच्या अवतीभोवती फिरणाऱ्या या कार्यक्रमात तिनं बँकेची सीईओ राणी इराणीची भूमिका साकारली आहे. पूजानं 'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'विद्याने मला फोन केला आणि तिला माझं काम खूप आवडल्याचं तिने मला सांगितलं. (Pooja Bhatt reveals Vidya Balan said she kissed damn well in Bombay Begums) 


आणखी वाचा : 'त्याने मला एकट्यात...', मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव



आणखी वाचा : Amitabh Bachchan यांची लेक श्वेता बच्चन आर्थिक संकटात?


पूजा पुढे विद्यानं केलेल्या किसिंग सीनच्या (Pooj Bhatt Kissing Scene) स्तुतीबद्दल सांगितले. पूजा म्हणाली, 'एक कलाकार म्हणून मला माहित आहे की किसिंग सीन करणं सोपं नाही, पण तू खूप मस्त किस केलस.’ एका स्त्री कलाकाराकडून हे ऐकून मला खूप आनंद झाला. लोकांना आमच्याकडे बघून वाटतं की आम्ही खूप ग्लॅमरस जीवनशैली जगतो, पण ऑनस्क्रीन रोमॅण्टिक सीन करणं खूप कठीण आहे, असे सीन शूट करताना आम्हाला अवघडल्यासारखं वाटत असतं पण स्क्रीनवर ते दिसू द्यायचं नसतं.'