आलियाला हवीत २ मुलं? बाळंतपणाआधीच मुलांचं भाकीत..रणबीरही म्हणतो ट्विन्स..नक्की मामला काय पाहा

आलियानं व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली...

Updated: Sep 25, 2022, 12:58 PM IST
आलियाला हवीत २ मुलं? बाळंतपणाआधीच मुलांचं भाकीत..रणबीरही म्हणतो ट्विन्स..नक्की मामला काय पाहा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सध्या तिच्या खासगी आणि फिल्मी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आलियाचे एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. RRR, गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) , डार्लिंग्ज (Darlings) आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. लवकर आई होणाऱ्या आलियानं एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिला दोनं मुलं हवी आहेत. 

आणखी वाचा : 'त्याने मला एकट्यात...', मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

2019 मध्ये, आलियाने तिच्या YouTube चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला होता, या व्हिडीओत आलिया तिची BFF आणि अभिनेत्री आकांशा रंजन कपूरसोबत होती. फ्रेंडशिप डे स्पेशल व्हिडिओमध्ये दोन मित्र प्रश्न-उत्तराचा खेळ (question-and-answer game) खेळतात. कारण त्यांनी एकमेकांबद्दलच्या प्रत्येक प्रश्नाचा अचूक अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा : Amitabh Bachchan यांची लेक श्वेता बच्चन आर्थिक संकटात?

यादरम्यान आलियानं 'मला किती मुलं हवी आहेत?' असा प्रश्न करत एक चिठ्ठी उचलली. आकांशा आणि तिची मैत्रीण आकांशा दोघेही उत्तर लिहितात. यावेळी 2 मुलं हवी (2 Boys) असल्याचं उत्तर दिलं. आकांशानं खास लिहिलं, '2 बॉइज' आणि आलियाने लगेच होकार दिला. यानंतर आलियाला तिच्या स्पीड डायलवर कोण आहे असे विचारण्यात आले. त्यावर उत्तर देत इतरांबरोबरच तिच्या स्पीड डायलवर रणबीरचा नंबर देखील आहे. (Alia Bhatt Onced Revealed she wants to have 2 baby boys)  रणबीरला एका मुलाखतीत याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तर कोणत्याही गोष्टीची कॉन्ट्रोव्हर्सी करू नका. मला त्यांनी एक दोन सत्य आणि एक असत्य अशी गोष्ट सांगायला सांगितली होती. आता काय सत्य आणि काय असत्य मी सांगू शकत नाही. 

आणखी वाचा : Malaika - Arbaaz च्या Divorce चं कारण आलं समोर..., एका सवयीनं घटस्फोट घडला

आणखी वाचा : नातीची मनधरणी कशी करतात आजोबा अमिताभ बच्चन...!

दरम्यान, आलियाच्या कामाविषयी जाणून घेऊ या, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ब्रह्मास्त्र पार्ट वन: शिवा' (Brahmastra Part One: Shiva) या चित्रपटाच्या यशाचे सहकलाकार आणि पती रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) आनंद घेत आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर जगभरात 300 कोटींची कमाई केली. लवकरच आलिया, रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) करण जोहरचा (Karan Johar) 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटात दिसणार आहे. आलिया 'हार्ट ऑफ स्टोन'मधून (Heart of Stone) हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती गॅल गॅडोट (Gal Gadot ) आणि जेमी डोर्नन (Jamie Dornan) यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय आलियाकडे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra ) आणि कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) फरहान अख्तरचा 'जी ले जरा' (Jee Le Zaraa) या चित्रपटातही दिसणार आहे.