मुंबई : राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांची तर संगीताचार्य आण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांच्या नावांची घोषणा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद ताव़डे यांनी केली. 5 लाख रूपये रोख, मानपत्र, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बाबा पार्सेकरांनी हौशी,प्रायोगिक तसच व्यावसायिक रंगभूमीवर आत्तापर्यंत 485 नाटकांचे नेपथ्य केले आहे.


तर निर्मला गोगटे यांनी महिला कला संगम या नाटकातून महिलांच्या संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या. अनेक मात्तब्बर संगीतकारांच्या रचना गाण्याची संधी त्यांना मिळाली.


व्यावसायिक नाटकांबोरबरच अनेक संस्कृत नाटकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.