प्राजक्ताच्या `हृदयात वाजे समथिंग`? केवळ चार शब्दांच्या कॅप्शननं समस्त क्रशवर्गाला पडली चिंता
Prajakta Mali Traditional Look in Blue Saree: सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्राजक्ता माळीची. प्राजक्ता आपल्या हटके आणि आकर्षक लुकसाठी कायमच चर्चेत असते. सध्या तिनं असं काही फोटोशूट शेअर केलं आहे की प्राजक्ता आता स्वत:च्याच प्रेमात पडायची बाकी आहे.
Prajakta Mali Post: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आपल्या दिलखेचक आणि गोड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे असंख्य फॅन्स आहेत. आपल्या इन्टाग्राम पेजवरून ती आपले हटके फोटोशूट कायमच शेअर करताना दिसते. तिच्या प्रत्येक फोटोंची चर्चा झाली नाही तरच नवल. कधी आकर्षक साडी आणि आभूषणांमध्ये ती आपलं पारंपारिक वेशभूषेतलं फोटोशूट शेअर करते तर कधी मॉडर्न आऊटफिट्समध्ये आपला जलवा दाखवायला काही कमी करत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच तिच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे. आह आह आह हाहाहा! तुम्ही बरोबर ओळखतं यावेळीही तिनं पारंपारिक वेशभूषतलं सोज्वळ तरीही आकर्षक असं सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे. यावेळी निळ्या साडीत अन् कानातले, गळ्यातले, अंगठ्या, नथ, बांगड्या, टिकली अशा सुंदर आभूषणांनी तिचे रूप सजले आहे.
प्राजक्ताला तिच्या लग्नाबद्दलही अनेकदा विचारले जाते. किंबहुना ती लग्न कोणीशी करणार आणि त्यातून तिच्या स्वप्नातला राजकूमार कोण असणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आत्तापर्यंत तिनं अनेक रॉमेण्टिक भुमिका केल्या आहेत तेव्हा तिच्यासाठी तिला साजेसा असा कोणतरी राजकुमार कधी येणार याकडे तिचे क्रशही लक्ष ठेवून आहेत हे नाकारून चालणार नाही. परंतु सध्या तिनं हे जे फोटोशूट शेअर केलं आहे त्याचसोबत तिनं कॅप्शनमध्ये असं काहीतरी लिहिलं आहे की अनेकांच्या मनात नानातऱ्हेचे प्रश्न पडले आहेत. यावेळी त्या चार शब्दांमुळे प्राजक्ताच्या मनात नक्की काय चाललंय असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यावेळी ती कोणाच्या प्रेमात पडली आहे का?
हेही वाचा - भर थिएटरमध्ये आजीबाईचा 'पिंगा'; 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील गाण्यावर धरला ठेका
नाही नाही... प्राजक्ताचे समस्त क्रश वर्गहो! अद्याप तरी ही ती कोणाच्या प्रेमात पडलीये याची चाहुल नाही. तर तिच्या फोटोंना साजेसे कॅप्शन असावे म्हणून तिनं हे आकर्षक शब्द लिहिले आहेत. 'प्राजक्ताराज' हा तिचा नवा ब्रॅण्ड आहे जो गेल्या वर्षीपासून सक्रिय आहे. तिच्या या ब्रॅण्डमार्फत ती सुंदर आणि आकर्षक कलेक्शन आणत आहे. यावेळी तिच्या या कलेक्शन्सना चांगला प्रतिसादही मिळताना दिसतो आहे. सध्या प्राजक्तानं याच आपल्या हटके ब्रॅण्डमधून एक लाघवी आणि नेत्रदिपक कलेक्शन आणलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''ह्रदयी प्रीत जागते.. जाणता अजाणता….. #म्हाळसा #चांदी 1- #बेलपानटिक #जोंधळेमणीगुंड #कोयरीतोडे #कुडी #बाजूबंद #गुलाबकाटा 2- बुगडी #नथ #पुतळीहार #मोहनमाळ #गहूतोडे #गजरीपैंजण 3- गजरीपैंजण 4- कंबरपट्टा''
हेही वाचा - VIDEO: ''पोरी, मला इच्छामरणही चालेल पण...'' ज्येष्ठ अभिनेत्यानं 'कोकण हार्टेड गर्ल'कडे मागितलं काम
यावेळी तिनं चार फोटो शेअर केले आहेत. ज्यानुसार तिनं बेलपानटिक, जोंधळेमणीगुंड, कोयरीतोडे, कुडी, बाजूबंद, गुलाबकाटा, बुगडी, नथ, पुतळीहार, मोहनमाळ, गहूतोडे, गजरी पैंजण, कंबरपट्टा हे हटके कलेक्शन आणले आहे.