PM Narendra Modi and Akshay Kumar : नरेंद्र मोदी आता फक्त भारताचे पंतप्रधान राहिले नाही तर गीतकारही झाले आहेत. या गोष्टीवर अनेकांना विश्वास बसत नसेल मात्र, हे सत्य आहे. नरेंद्र मोदी यांनी नवरात्री सुरु होण्याच्या एक आठवड्या आधी 'गरबो' या गाण्याचे बोल लिहिले. तर हे गाणं ध्वनि भानुशालीनं गायलं आहे. सगळीकडे नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या कंपोजिशनचीच चर्चा सुरु आहे. वेगवेगळे लोक त्यांची स्तुती करत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची चिंता वाढली आहे. त्याविषयी त्यानं पोस्ट शेअर करत सांगितले आहे. अक्षय असं का म्हणाला चला जाणून घेऊया...


नरेंद्र मोदी यांचं 'गरबो' नवं गाणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून या गाण्याविषयी सांगत म्हटले की, नवरात्र सुरु झाली असून मला तुमच्या सगळ्यांसोबत काही दिवसांपूर्वी मी लिहिलेलं गरबा गाणं शेअर करण्यात मला आनंद होतोय. या गाण्यानं नवरात्रोत्सव साजरा करूया. मीट ब्रोज आणि दिव्या कुमार यांचे गाण्याला आवाज आणि म्युजिक देण्यासाठी आभार. नरेंद्र मोदी यांचे ट्वीट पाहता अक्षय कुमारनं त्यांना शुभेच्छा देत चिंता व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी जी हे खूप चांगलं आहे. सर तुम्ही आता आमच्या फिल्डमध्ये सुद्धा... आता आम्ही कुठे जायचं? नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा!



खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्री स्पेशल गरबोचे बोल लिहिले आहे. हे गाणं आता सुरु झालेल्या नवरात्रीच्या सेलिब्रेशनसाठी नक्कीच योग्य असेल. हे गाणं नवरात्रीमध्ये सगळ्यांमध्ये येणारी एकता आणि सांस्कृतिक विविधता दाखवते. ध्वनि भानुशाली हे गाणं गायलं आहे आणि व्हिडीओत अभिनय देखील केला आहे. तर हे गाणं बागची यांनी कंपोज केलं आहे. तर जॅकी भगनानी हा ट्रॅक बनवला आहे. 


हेही वाचा : रोहित शर्माच्या लग्नात विराट- सोनाक्षीचा डान्स, VIDEO पाहून हसू होईल अनावर


दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या या गाण्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'नरेंद्र मोदीजी यांनी गाण्याचे खूप चांगले बोल लिहिले आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'गायक ध्वनी आणि गाणं लिहिणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप चांगलं जुळून आलं आहे.' तिसरा नेटकरी 'सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसला.'