Virat and Sonakshi Dance Video : बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं खूप जूनं आहे. अनेकदा आपल्याला क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकारांची जोडी पाहायला मिळते. तर त्यांच्या चाहत्यांना देखील अशा जोड्या प्रचंड आवडतात. सध्या सगळीकडे वर्ल्ड कपचीच चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री डान्स करताना दिसत आहे. मात्र, यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी अनुष्का नाही. तर विराट बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत डान्स करताना दिसत आहे. ते दोघेही स्टेजवर डान्स करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो की सोनाक्षी तिच्या सुपरहिट ठरलेल्या आर. राजकुमार या चित्रपटातीस साडी के फॉल सा कभी मैच किया रे… या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी विराट आणि सोनाक्षीनं त्यांच्या डान्सनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर इतक्या वर्षांनंतर हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. तर हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ रोहित शर्माच्या लग्नातील असल्याचं म्हटलं आहे.
Kohli dancing for Saree Ke Fall Sa with Sonakshi in 2015 @imVkohli
I guess this is from Rohit's wedding party . pic.twitter.com/VRaar87PT2
— (@KohlifiedGal) October 10, 2023
विराट आणि सोनाक्षीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की अनुष्का आणि सोनाक्षी एकमेकांना हेट करायच्या. दुसरा नेटकरी म्हणाला की त्यावेळी कोहली एकटा लग्नात गेला होता असं मी देखील ऐकलंय, तर सोनाक्षी त्यावेळी बंटी सचदेहला डेट करत होती असं म्हटले जात होते.
हेही वाचा : 'एवढा आत्मविश्वास...', मुग्धा- प्रथमेशनं गाडी चालवताना केलं असं काही; VIDEO पाहून नेटकरी संतापले
विराट आणि सोनाक्षीचा हा व्हायरल व्हिडीओ 2015 चा आहे. एकीकडे सोनाक्षीसोबत डान्स करत असलेला विराट हा दुसऱ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे म्हटले जात होते. त्या काळातच विराट आणि अनुष्काच्या रिलेशनशिपविषयी कोणालाही काही माहिती नव्हती. एकीकडे विराट त्याच्या करिअरच्या शिखरावर होता. तर दुसरीकडे विराटच्या लव्ह लाईफची सुरुवात झाली होती. विराट आणि अनुष्कानं 2018 मध्ये लग्न केलं. त्या दोघांनी कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगी असून वामिका असं तिचं नाव आहे. तर अनुष्का दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. याशिवाय विराट आणि अनुष्का यांची जोडी ही कपल गोल ठरतात.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.