मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. त्यात आता मराठी इंडस्ट्रीतील जोडपं प्रिया बापट आणि उमेश कामतलाही कोरोना झाला आहे. त्या दोघांनीही सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेश आणि प्रिया या दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे त्यांनी घरातच क्वॉरंटाईन करून घेतलं आहे. मात्र हे दोघेही शूटमुळे सतत बाहेर असतात आणि इतरांच्या संपर्कातही येतात. त्यामुळे जे-जे आमच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि वाटल्यास कोरोना चाचणी करावी, असं आवाहन केलं आहे.


प्रिया आणि उमेश यांची आणि काय हवं ही हलकीफुलकी वेब सिरीज आहे. ज्याचा तिसऱ्या सीझनसाठी त्या दोघांनीही शूटिंगला सुरूवात केलेली. लवकरच ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असंही त्यांनी सांगितलेलं.


याशिवाय दादा एक गूड न्यूज आहे, या नाटकानिमित्तही हे दोघे सतत वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचं आणि कोविड चाचणी करण्याचं आवाहन प्रिया-उमेशने केलेलं आहे.