`लग्न झालेलं असताना परपुरुषासोबत...,` किस किंवा इंटीमेट सीन देण्यावर `जवान` अभिनेत्रीचे मोठे वक्तव्य
Priya Mani : प्रियामणी ही लवकरच जवान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियामणी शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान, प्रियामणी आपल्याला `द फॅमेली मॅन` या वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती.
Priya Mani : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आणि द फॅमिली मॅन वेब सीरिजमध्ये दिसलेली प्रियामणि तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रियामणिचा हा आगामी चित्रपट 'जवान' आहे. शाहरूखसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. प्रियामणिला शाहरुखसोबत स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. प्रियामणि ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जे किंसिंग किंवा इंटीमेट सीन्स देत नाही. तिनं आजवर तिची नो किंसिंग पॉलिसी ही तशीच राहु दिली आहे. नो किंसिंग पॉलिसी जशी आहे तसं ठेवण्याचं कारण काय आहे याविषयी प्रियामणिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
प्रियामणीला अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर होत्या. या चित्रपटांमध्ये तिला इंटिमेट सीन करण्याची गरज होती. पण तिनं या सगळ्या ऑफर साफ नाकारल्या. ऑनस्क्रिन तिला गालावर किस करण्यापेक्षा जास्त काही करायचं नाही आहे आणि ही तिची वैयक्तिक निवड आहे. प्रियामणि इंटीमेट सीन्सपासून फक्त लांब राहत नाही तर तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये देखील 'नो किसिंग' क्लॉज हा अॅड करण्यात येतो. पण प्रियामणिनं नो किसिंग पॉलिसीचा हा निर्णय का घेतला याविषयी एका मुलाखतीत म्हणाली की "मी ऑनस्क्रीन किस करणार नाही. यासाठी मला नेहमी माझ्याकडून नकार असेल. मला माहितीये की ही फक्त एक भूमिका आहे आणि ते माझं काम आहे. पण पर्सनली बोलायचं झालं तर, ऑनस्क्रीन मी कोणत्या दुसऱ्या पुरुषाला किस करावं लागलं तर मी अनकमर्फेटेबल होईल. हे यामुळे कारण माझं लग्न झालं आहे आणि मला माझ्या पतीला उत्तर द्याव लागेल."
ती पुढे म्हणाली, 'मला माहित आहे की जेव्हाही तो प्रोजेक्ट प्रदर्शित होईल तेव्हा दोन्ही बाजूचे माझे कुटुंब ते पाहतील. त्यांना हे माहित आहे की हे माझे काम आहे, परंतु मला अस्वस्थ वाटून घ्यायचे नाही. त्या लोकांना वाटू शकतं की लग्न झाल्यानंतरही आमची सून हे सगळं का करते? कोणी दुसरी व्यक्ती तिच्यावर हात कसा ठेवू शकते? ते मला असं काही बोलणार नाहीत, पण ही माझी वैयक्तिक निवड आहे'.
हेही वाचा : बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या बॅंक अकाऊंटमध्ये कोट्यावधींची रक्कम
प्रियामणीनं 23 ऑगस्ट 2017 रोजी मुस्तफा राजसोबत सप्तपदी घेतल्या. त्या दोघांनी खूप प्रायव्हेट पद्धतीनं लग्न केलं. प्रियामणीनं फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाही तर त्यासोबत बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. प्रियामणीनं 'रावण', 'रक्तचरित्र 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'अतीत' आणि 'सलाम वेंकी'मध्ये काम केले आहे. आता प्रियामणी लवकरच शाहरुख खानच्या 'जवान' आणि अजय देवगणसोबत 'मैदान'मध्ये दिसणार आहे.