बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या बॅंक अकाऊंटमध्ये कोट्यावधींची रक्कम

Saisha Bhoir's Mother : साईशा भोईरची आई पूजाला गेल्या काही दिवसांपासून कोठडीत आहे. फसवणूक प्रकरणी पूजाची कोठडी वाढवली आहे. त्याचा परिणाम हा साईशाच्या करिअरवर होणार नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 1, 2023, 11:00 AM IST
बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या बॅंक अकाऊंटमध्ये कोट्यावधींची रक्कम title=
(Photo Credit : Social Media)

Saisha Bhoir's Mother : ‘रंग माझा वेगळा’ फेम मराठी कलाकार साईशा भोईरची आई पूजा भोईरला मे 2023 मध्ये आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तिची आई पोलीस कोठडीड आहे. पूजा भोईरनं 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका शैक्षणिक संचालकानं आणि त्यांच्या पत्नीनं केली होती. त्यानंतरच कफ परेडमध्ये पोलिसांनी पूजाला अटक केली. तेव्हा पासून पूजा कोठडीत असून तिच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. आता अशी माहिती समोर आली आहे की साईशाचे वडील आणि आई, विशांत भोईल आणि पूजा भोईर यांचे मालमत्ता जप्त करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

किती आहे साईशाच्या आई-वडिलांची एकूण संपत्ती? 

‘टाइम्स ऑफ इंडिया’ नं दिलेल्या वृत्तानुसार, साईशा आईच्या डिमॅट खात्यात 3 कोटी 33 लाख रुपये सापडले आहेत. इतकंच नाही तर तिच्याकडे 27 लाखा रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तिच्याकडे मुंबईत एक फ्लॅट आहे. कार, बँक अकाऊंट आणि साईशाच्या खात्यांशी संबंधित बचतीचे पैसे अशा अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्याचा आता तपास करण्यात येत आहे. याशिवाय विशांत आणि पूजा साईशा बरोबर केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय ट्रिपचीही ते पोलीस चौकशी करत आहेत.
 
पूजाविरोधात सगळ्यात आधी शैक्षणिक संचालकानं आणि त्यांच्या पत्नीनं नाही तर त्या आधी देखील अनेकांनी तिच्या विरोधात अनेकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. गुंतवणुकदारांनी काही महिन्यांपूर्वी पूजाच्या कंपनीत पैसे गुंतवले होते, तिने त्यांना आठवड्याला 10 टक्के परतावा देण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर त्या लोकांना अनेक आठवडे पैसे मिळाले पण, नंतर त्यांचे चेक बाऊन्स होई लागले होते. हे पाहता त्यांनी पूजाला याविषयी विचारले असता तिनं त्यावर नीट उत्तर न देता उलट उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी पूजाविरोधात पोलिस तक्रार दाखल केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नाशिकमध्ये काही लोकांनी पूजाचा पती विशांत भोईरच्या विरोधात लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पूजाच्या आईने लोकांची 3 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं कळतंय. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी लवकरच तपास घेणार आहे. मुंबई पोलीस हे पूजाची चौकशी करत असून ते साईशाच्या सेटवर देखील पोहोचले होते. इतकंच नाही तर तिनं आधी ज्या सेटवर काम केलय त्या ठिकाणी देखील ते गेले होते. 

हेही वाचा : इशाच्या लग्नात भावांची हजेरी का नाही? पत्रकाराच्या प्रश्नावर संतापले Dharmendra

नवा गडी नवा राज्य आणि चला हवा येऊ द्या या मालिकांमध्ये पूजा साईशा दिसणार का असा प्रश्न असता. ई टाइम्सनं भोईर कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीशी संपर्क केला होता. त्यांनी साईशाच्या कामावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. "साईशाच्या आईला अटक झाल्याचं खरं आहे. पण साईशा अजून लहाण आहे. तिच्या घरात काय सुरू आहे, काय घडतंय हे कळण्याइतपत ती मोठी नाहीये. सध्या तिच्या आईसोबत जे काय घडतंय ही तिला माहिती नाही. ती शूटिंग करत आहे. सेटवरही बोलणं टाळतोय. साईशाला कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेतोय," असंही त्यांनी सांगितलं.