मुंबई : बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियंका चोप्राचा बॉयफ्रेंड मात्र परदेसी आहे. आतापर्यंत प्रियंका आणि अमेरिकी गायक निक जोनस यांच्यात काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा होत्या. पण जेव्हा प्रियंका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनसला घेऊन मुंबई विमानतळावर अवतरली तेव्हा या चर्चेच्या ठिणगीला हवा मिळाली. विमानतळावर कॅमेऱ्यापासून बचाव करण्याचा प्रियंकाचा प्रयत्न पूरता फसला आणि मीडियाच्या कॅमेऱ्यात प्रियंका निक कैद झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात दाखल झाल्यानंतर दोघेही डिनर डेटसाठी बाहेर पडले. तेव्हाही ते मीडियाच्या कॅमेऱ्यातून सुटू शकले नाहीत. डिनर डेटला प्रियंकाने चैकाचा ड्रेस परिधान केला होता तर निक व्हाईट शर्ट आणि ट्राऊजरमध्ये दिसला. प्रियंका-निकचा हातात हात घातलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियंकाचे चाहते ही या जोडीबद्दल भलतेच उत्सुक आहेत. तुम्हीही पहा प्रियंका-निकचे फोटोज...



या डिनर डेटला प्रियंका एकटी नव्हती तर तिची आई मधु चोप्रा आणि भाऊही तिच्यासोबत होता. यावेळेस मधु चोप्रा यांनी फ्लोरल साडी नेसली होती. निकच्या कुटुंबियांशी ओळख झाल्यानंतर आता प्रियंकाच्या कुटुंबियाशी ओळख करुन घेण्याची नीक भारतात दाखल झाला आहे. 


गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 'जुमांजी : वेलकम टू द जंगल'च्या प्रमोशनसाठी भारतात येण्याची निकची इच्छा बोलून दाखवली होती. अलिकडे निक-प्रियंकाला कॉलिफोर्नियाच्या वेस्ट हॉलिवूडमध्ये एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण यावर दोघेही अजून खुलेपणाने बोलले नाही आहेत.